इंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात एक इतिहास लिहिला गेला आहे. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकर रहीमने भारताविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासक कामगिरी केली आहे.
रोहित शर्माने १७व्या षटकात रहीमला जीवदान दिले होते. त्यावेळी रहीम हा फक्त चार धावांवर होता. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहितने रहीमचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी रोहित दुसऱ्या स्लीपमध्ये होता.
या जीवदानाचचा पुरेपूर फायद रहीमने उचलल्याचे पाहायला मिळाले. या जीवदानानंतर रहीम स्थिरस्थावर झाला आणि त्याने त्यानंतर संयमी फलंदाजी केली. दोन अंकी धावसंख्या उभारत रहीमने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आता रहीमने आपल्या नावावर केला आहे.
भारताविरुद्धच्या आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये रहीमने चारशे धावांचा टप्पा पार केला आहे. भारताविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये चारशे धावा करणारा रहीम हा पहिला बांगलादेशचा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद अश्रफूलच्या नावावर होता. अश्रफूलने भारताविरुद्ध ३८६ धावा केल्या होत्या.
... अन् रोहित शर्माने दिलं बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान
इंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने एक जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. भारताने बांगलादेशच्या चार फलंदाजांना मागे धाडले होते. त्यानंतर बांगलादेशचा पाचवा फलंदाज बाद करण्याची भारतापुढे नामी संधी होती. पण रोहितमुळे भारताला ही संधी गमवावी लागली.
ही गोष्ट घडली १७व्या षटकात. गोलंदाजी करत होता मोहम्मद शमी. अचूक टप्प्यावर शमीने चेंडू टाकला आणि त्यावर बांगलादेशचा मुशफिकर रहीम चकला. त्याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू स्लीपच्या दिशेने गेला. यावेळी एक सोपा झेल रोहितला पकडता आला असता. पण दुसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या रोहितने हा झेल सोडत जीवदान दिले. त्यावेळी रहीम चार धावांवर खेळत होता.
विजयापासून भारत फक्त सहा पावले दूर
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ फक्त सहा पावले दूर आहे. भारतीय गोलंदजांच्या भेदक गोलंदाजीमुळे संघ आजच्या दिवशीच विजयाचे स्वप्व पाहत आहे.
भारताने एकूण ३४३ धावांची आघाडी मिळवल्यानंतर बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले. पण दुसऱ्या डावातही बांगलादेशच्या फलंदाजांची पडझड पाहायला मिळाली. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत त्यांची उपहारापर्यंत ४ बाद ६० अशी स्थिती केली आहे. त्यामुळे आता सहा फलंदाजांना बाद केल्यावर भारतीय संघ विजय मिळवून शकतो. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दोन आणि उमेश यादव व इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
Web Title: India Vs Bangladesh, 1st Test: Bangladesh's Mushfiqur Rahim made history against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.