भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारताच्या गोलंदाजांनी फक्त 150 धावांमध्ये बांगलादेशचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे त्यांची दिवसअखेर 1 बाद 86 अशी स्थिती आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न भारतीय संघ बघत आहे. भारताचा संघ सध्या 64 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात कर्णधार विराट कोहली प्रेक्षकांवर संतापलेला पाहायला मिळाला. नेमकं झालं काय?
बांगलादेशनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवताना पहिल्याच सत्रात सलामीवीरांना माघारी पाठवले. 2 बाद 12 अशा अवस्थेत सापडलेल्या बांगलादेशसाठी मोमिनूल हक ( कर्णधार) आणि मुश्फिकर रहीम ही जोडी धावली. तत्पूर्वी, मोहम्मद शमीनं बांगलादेशला तिसरा धक्का दिला. ही जोडी अश्विननं तोडली अन् बांगलादेशची अवस्था 4 बाद 99 अशी केली. अश्विननं मोमिनूल ( 37) याला बाद केलं. ही विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली.
व्हिडीओ...