भारत वि. बांगलादेश : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना आजपासून इंदूर येथे सुरू आहे. मोहम्मद शमी, आर अश्विन यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेशनं सपशेल शरणागती पत्करली. बांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले.
LIVE
Get Latest Updates
03:07 PM
बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांत संपुष्टात, शमीचे तीन तर अश्विन आणि उमेशचे दोन बळी
भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंजांनी आठ विकेट्स घेतल्या.
02:47 PM
रवींद्र जडेजाने तैजुल इस्लामला केले धावचीत, बांगलादेशचा नववा फलंदाज माघारी
02:34 PM
बांगलादेशला आठवा धक्का
02:13 PM
चहापानापर्यंत बांगलादेशच्या 7 बाद 140 धावा
शमीने तीन तर अश्विनने दोन फलंदाजांना धाडले माघारी
02:12 PM
मेहदी हसन शून्यावर बाद, बांगलादेशचा सातवा फलंदाज माघारी
02:10 PM
मुशफिकूर रहिम 43 धावा काढून माघारी
01:05 PM
बांगलादेशला चौथा धक्का
11:37 AM
लंचपर्यंत भारताचेच वर्चस्व, बांगलादेश ३ बाद ६३
11:02 AM
मोहम्मद शमीने मिळवला बळी
10:24 AM
बांगलादेशला दुसरा धक्का
10:00 AM
बांगलादेशला पहिला धक्का, उमेश यादवने घेतली इम्रुल कायेसची विकेट
बांगलादेशला पहिला धक्का, उमेश यादवच्या गोलंदाजीवर रहाणेने टिपला इम्रुल कायेसचा झेल, इम्रुल कायेस 6 धावा काढून माघारी
09:31 AM
बांगलादेशचा अंतिम संघ
बांगलादेशचा संघ - मोमिनुल हक (कर्णधार) , इमरूल कायेस, शादमान इस्लाम मुशफिकूर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मोहम्मद मिथून, लिटन दास, मेहिदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, अबू जायेद, इबादत हुसैन
09:13 AM
इशांत शर्माचे भारतीय संघात पुनरागमन
भारताचा संघा : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा
09:08 AM
बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
Web Title: India vs Bangladesh, 1st Test, Day 1 LIVE: Bangladesh winning the toss & decide to bat first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.