IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट

तिसऱ्या दिवसअखेर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशच्या संघाने धावफलकावर ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा लावल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 05:16 PM2024-09-21T17:16:41+5:302024-09-21T17:24:51+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 1st Test Day 3 Stumps have been taken due to bad light India needing just six wickets to win Bangladesh need 357 runs | IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट

IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नईच्या मैदानात सुरु असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अगदी मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसअखेर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला त्यावेळी ५१५ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने धावफलकावर ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा लावल्या होत्या.

बांगलादेशच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी अजून ३५७ धावा करायच्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघाला फक्त ६ विकेट्स मिळवायच्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवसाअखेर ढगाळ वातावरणामुळे खेळ वेळेआधी थांबला असला तरी हा कसोटी सामना भारतीय संघाच्या हातात आहे, हे चित्र एकदम स्पष्ट दिसते. 

सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी, बुमराहनं फोडली ही जोडी


 
भारतीय संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावाच्या तुलनेत चांगली सुरुवात केली.  झाकीर हसन आणि  शादमान इस्लाम या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहनं झाकीर हसनची विकेट घेत ही जोडी फोडली. यशस्वी जैसवालनं झाकीरचा अप्रतिम झेल टिपला. हा गडी १३ धावांवर बोल्ड झाला. त्यानंतर अश्विननं 

तिसऱ्या दिवशी अश्विनची दाखवली गोलंदाजीतील जादू; तिघांना धाडलं तंबूत

पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळाली नव्हती. पण तिसऱ्या दिवशी अश्विनने तीन विकेट्स घेत गोलंदाजीतील आपला धाक दाखवून दिला. शादमान इस्लामच्या  रुपात अश्विनला या कसोटी सामन्यातील पहिलं यश मिळाले. त्याने ६८ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर मोमीनल हक १३ (२४) आणि मुशफिकूर रहिम १३ (११) यांनाही अश्विननं तंबूचा रस्ता दाखला. 

बांगलादेशच्या कर्णधाराचं अर्धशतक, शाकिबही मैदानात 

आघाडीच्या गड्यांनी तंबूचा रस्ता धरल्यावर बांगलादेशचा कर्णधार नजमुल होसेन शान्तो हा मैदानात तग धरून उभा राहिला आहे. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला त्यावेळी तो ६० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५१ धावांवर खेळत होता. दुसरीकडे शाकिब अल हसन १४ चेंडूत ५ धावांवर क्रिजवर होता.  

Web Title: India vs Bangladesh, 1st Test Day 3 Stumps have been taken due to bad light India needing just six wickets to win Bangladesh need 357 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.