इंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जिथे आंतरराष्ट्रीय अम्पायर चुकताना दिसत होते. तिथेच इंदूरच्या पंचांनी महत्वाचे निर्णय देत सामना योग्य मार्गाने खेळवल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यातील दोन महत्वाचे निर्णय मैदानावरील पंचांनी चुकीचे दिले होते. पण या सामन्यात तिसरे पंच असलेल्या नितिन मेनन यांनी योग्य निर्णय दिल्याचे पाहायला मिळाले. मेनन हे इंदूरचे पंच आहे आणि बरीच वर्षे भारताकडून अम्पायरिंग करत आहेत.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चक्क दोनदा माफी मागण्याची वेळ पंचांवर आली. कारण मैदानातील पंचांच्या हातून दोन निर्णय चुकीचे दिले गेले. या निर्णयांमुळे सामन्यावर मोठा परीणाम होऊ शकला असता.
कसोटी सामन्यात जर डीआरएस नसले असते तर पंचांच्या चुकीमुळे सामन्याला वेगळे वळण मिळू शकले असते. पण डीआरएस असल्यामुळे योग्य निर्णय पाहायला मिळाले. हे दोन्ही चुकीचे निर्णय भारताच्या खेळाडूंबाबत देण्यात आले होते.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि द्विशतकवीर मयांक अगरवाल यांच्याबाबत हे चुकीचे निर्णय दिल्याचे पाहायला मिळाले. कोहली शून्यावर असताना त्याच्याविरोधात बांगलादेशच्या खेळाडूंनी पायचीतचे जोरदार अपील केले. पण मैदानावरील पंचांनी तो नाबाद असल्याचे सांगितले. त्यानंतर काही क्षणात बांगलादेशने डीआरएस घेतला. त्यामध्ये चेंडू स्टम्पला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी कोहलीला आऊट ठरवले.
अगरवालने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली. पण पंचांनी मयांकला ८२ धावांवर असताना बाद ठरवले होते. मेहंदी हसनच्या गोलंदाजीवर बांगलादेशने मयांकविरोधात पायचीतचे अपील केले. मैदानावरील पंचांनी मयांकला बाद ठरवले. पण मयांकने यावेळी डीआरएस घेतला आणि त्यामध्ये तो नाबाद ठरवला गेला.