Join us  

अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास

कसोटी कारकिर्दीतील अश्विनचे हे सहावे शतक आहे. चेपॉकच्या मैदानात त्याने झळकावलेली ही दुसरी टेस्ट सेंच्युरी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 5:23 PM

Open in App

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन याने आपल्या भात्यातील फटकेबाजीनं चेपॉकचं मैदान गाजवलं. आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर अश्विन आणि जड्डूनं मोर्चा सांभाळला. दोघांनी जबरदस्त भागीदारी करत बांगलादेशच्या संघाला बॅकफुटवर ढकलले.

लोकल बॉय अश्विन याने या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने १०८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने शतक साजरे केले. कसोटी कारकिर्दीतील अश्विनचे हे सहावे शतक आहे. चेपॉकच्या मैदानात त्याने झळकावलेली ही दुसरी टेस्ट सेंच्युरी ठरली. 

आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकी खेळीसह सेट केला हा विक्रम

आर. अश्विन याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतकी खेळी केली. कोटी क्रिकेटच्या इतिहासात आठव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अश्विन ४ शतकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत डॅनिएल व्हिक्टोरी अव्वलस्थानी आहे. त्याच्या खात्यात ५ शतकांची नोंद आहे. 

अशी कामगिरी करणारा अश्विन एकमेव खेळाडू

अश्विन याने या शतकी खेळीसह अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. कसोटीत ५०० पेक्षा अधिक विकेट आणि २० वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत स्टुअर्ट ब्रॉडचा नंबर लागतो. त्याने ६०४ विकेटसह १४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. 

अश्विनची जड्डूसोबत जम्बो भागीदारी,  पहिल्या दिवसाअखेर भारत ६ बाद ३३९ धावा

अश्विननं जडेजाच्या साथीनं सातव्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. हा एक विक्रमच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाअखेर दोघेही नाबाद परतली. रवींद्र जडेजा हा देखील शतकी खेळीच्या दिशेनें वाटचाल करत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने ६ बाद ३३९ धावा धावफलकावर लावल्या होत्या. अश्विन ११२ चेंडूत १०२ धावांवर नाबाद होता. दुसरीकडे जडेजानं ११७ चेंडूत १० चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ८६ धावा केल्या होत्या.  

अश्विन-जड्डूनं सेट केला  सातव्या विकेटसाठी विक्रमी  भागीदारीचा रेकॉर्ड 

अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीनं सातव्या विकेटसाठी पहिल्या दिवसाअखेर नाबाद १९५ धावांची भागीदारी केली. भारताकडून बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतील ही सर्वोच्च भागीदारी आहे. याआधी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकर आणि झहीर खान या जोडीच्या नावे होता. या दोघांनी २००४ मध्ये ढाका कसोटी सामन्यात १३३ धावांची भागीदारी केली होती. 

टॅग्स :आर अश्विनभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ