Join us  

IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील क्लास खेळीसह त्याने श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिस याला मागे टाकले. आता फक्त इंग्लंडचा जो रुट जैस्वालच्या पुढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 1:39 PM

Open in App

Yashasvi Jaiswal Record : भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जिगरबाज खेळ केला. एका बाजूनं विकेट्स विकेट्स पडत असताना तो मोठ्या नेटानं खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला. पंतसोबत ६२ धावांची भागीदारी करत त्याने संकटात सापडलेल्या टीम इंडियाला सावरलं. ९५ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. नाहिद राणा याने यशस्वी खेळीला ब्रेक लावला. जैस्वालनं ११८ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ५६ धावा केल्या.

लंकेच्या मेंडिसला मागे टाकत जैस्वालचा डंका

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात महत्त्वपूर्ण खेळीसोबतच यशस्वी जैस्वालनं खास विक्रमालाही गवसणी घातली आहे. २०२४ मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील क्लास खेळीसह त्याने श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिस याला मागे टाकले. आता फक्त इंग्लंडचा जो रुट जैस्वालच्या पुढे आहे.

जो रुटपाठोपाठ सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचला यशस्वी

२०२४ मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रुट अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यात ९८६ धावा केल्या आहेत. जैस्वालनं ७ सामन्यात ७६४ * धावा केल्या आहेत. या यादीत श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस ६ कसोटीतील ७४८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जैस्वालनंतर लागतो गिल अन् रोहितचा नंबर

यंदाच्या वर्षात भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करण्यात यशस्वी जयस्वाल आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत शुबमन गिलचा समावेश होतो. शुबमन गिलनं आतापर्यंत ४९८ धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात ४६१ धावा जमा आहेत.  

 

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश