भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-20त यजमानांना पराभव पत्करावा लागला. पण, हे अपयश मागे सोडून टीम इंडिया राजकोट येथे होणाऱ्या ट्वेंटी-20त विजय मिळवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरणार आहे. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरताच कर्णधार रोहित शर्मा अनोखं शतक साजरं करणार आहे. या कामगिरीसह तो पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे.
पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांना 148 धावाच करता आल्या. सौम्या सरकार - मुश्फिकर रहीम यांनी भारताच्या चमूत तणाव निर्माण केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या हातून सामना खेचून आणला. रहीमनं अर्धशतकी खेळी करताना बांगलादेशला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतावर पहिला विजय मिळवून दिला. बांगलादेशनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशनं 7 विकेटनं हा सामना जिंकला. नवव्या प्रयत्नांत बांगलादेशला टीम इंडियाला ट्वेंटी-20त पहिल्यांदा नमवण्यात यश आले. या सामन्यात रोहितला केवळ 9 धावाच करता आल्या आणि पहिल्याच षटकात तो बाद झाला.
त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रोहितच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानावर येताच रोहित शतक नोंदवणार आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शंभर सामने खेळणारा तो पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरणार आहे. पहिल्या सामन्यात त्यानं 99 सामन्यांचा पल्ला गाठून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 98 सामन्यांचा विक्रम मोडला होता. आता त्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांचे शतक साजरे करण्याची संधी आहे. भारताकडून हा मान पहिला ( पुरुष/महिला) महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं पटकावला. शिवाय रोहित या कामगिरीसह पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे.
बांगलादेशनं दिल्लीत इतिहास घडवला, पण त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला
दुसऱ्या टी२० सामन्यावर चक्रीवादळाचे सावटदिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे प्रभावित पहिल्या ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी येथे खेळल्या जाणाºया दुसºया लढतीवर चक्रीवादळाचे सावट आहे. चक्रीवादळ ‘महा’ गुरुवारी गुजरातच्या समुद्र किनाºयावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या भाकीतानुसार ‘महा’ पोरबंदर व दीव दरम्यान गुरुवारी पहाटे वादळच्या रुपाने गुजरातच्या किनाऱ्यावर दाखल होईल.