Join us  

IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्ध कोणत्याही संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 10:46 PM

Open in App

India vs Bangladesh, 2nd T20I  : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवांचा भरणा असलेल्या टीम इंडियाने दिल्लीचंही मैदान मारलं आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडियानं बांगलादेश विरुद्धची टी- मालिका २-० अशी खिशात घातली. नितीश रेड्डी ७४ (३४) रिंकू सिंह ५३ (२९) आणि हार्दिक पांड्या ३२ (१९) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद २२१ धावा केल्या होत्या.

बांगलादेश विरुद्ध कोणत्याही संघानं मिळवलेला सर्वात मोठा विजय

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १३५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. महमुदुल्लाहनं केलेल्या ३९ चेंडूतील ४१ धावा वगळता एकाही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. भारतीय संघाने ८६ धावांसह विजय नोंदवत ३ सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्ध कोणत्याही संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.

प्रत्येक गोलंदाजाच्या खात्यात किमान एक विकेट

गोलंदाजीमध्ये भारताकडून नितीश रेड्डीसह वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय सूर्यानं अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग यांच्याकडून गोलंदाजी करून घेतली. या प्रत्येकाने आपल्या खात्यात १-१ विकेट जमा केली.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेशसूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्यारिंकू सिंग