Mominul Haque चं शतक; कमी वेळात सामना जिंकून दाखवणं टीम इंडियाला जमेल?

 दुसऱ्या सत्रात लवकरात लवकर उर्वरित विकेट्स घेऊन पहिल्या डावातील बॅटिंग करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:54 PM2024-09-30T12:54:44+5:302024-09-30T12:58:48+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 2nd Test Day 4 Mominul Haque's hundred guides Bangladesh to 205/6 at lunch on Day 4 How Team India Next Plan For Result Kanpur Test | Mominul Haque चं शतक; कमी वेळात सामना जिंकून दाखवणं टीम इंडियाला जमेल?

Mominul Haque चं शतक; कमी वेळात सामना जिंकून दाखवणं टीम इंडियाला जमेल?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh, 2nd Test  Day 4 : कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस वाया गेल्यावर दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने खेळाच्या सुरुवातीला ठराविक अंतराने विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलले.

मोमिनुल हकच शतक

एका बाजूला बांगलादेशचे अन्य फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. पण दुसऱ्या बाजूला मोमिनुल हक (Mominul Haque) अगदी तग धरून बॅटिंग करताना दिसून आले. उपहाराआधी एकहाती खिंड लढवत त्याने शतकालाही गवसणी घातली. त्याच्या शतकाच्या जोरावर चौथ्या दिवसाच्या उपहारापर्यंत बांगलादेशच्या संघाने ६ गड्यांच्या बदल्यात २०० धावांचा आकडा पार केला. 

कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता, पण टीम इंडियाकडे सामन्याला कलाटणी देण्याचीही असेल संधी 

पहिल्या सत्रात भारतीय संघाने टिच्चून गोलंदाजी करत उपहारापर्यंत ३ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या सत्रात लवकरात लवकर उर्वरित विकेट्स घेऊन पहिल्या डावातील बॅटिंग करण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल. पहिल्या दिवसांतील ३५ षटकांचा खेळ आणि त्यानंतर  दोन दिवस एकही चेंडू फेकला गेला नसल्यामुळे भारत-बांगलादेश यांच्यातील सामना अनिर्णित राहण्याकडे झुकला आहे. सामन्याचा निकाल मुश्किल वाटत असला तरी उपहारानंतर चौथ्या दिवसाच्या खेळातील जवळपास ६० षटकाहून अधिक खेळ बाकी आहे. यात बांगलादेशला लवकरात लवकर आटोपून टीम इंडियाने अधिकाधिक षटकांची बॅटिंग मिळाली तर एक संधी निर्माण होऊ शकते.  यासाठी टीम इंडियाला आधी बांगलादेशच्या संघाला लवकरात लवकर ऑल आउट करावे लागेल.  

 भारतीय संघाने एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा दोन दिवसांत जिंकलीये कसोटी

दोन दिवसांत कसोटी सामन्याचा निकाल लागणं तस मुश्किलच आहे. पण भारतीय संघाने एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा अवघ्या दोन दिवसांत कसोटी जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. ३ जानेवारी २०२४ रोजी भारतीय संघाने केपटाऊनच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना ७ विकेट्स राखून जिंकला होता. त्याआधी २४ फेब्रुवारी २०२१ रोजी अहदाबाद कसोटी सामन्यात इंग्लंडचा खेळही टीम इंडियाने अवघ्या दोन दिवसांत खल्लास केला होता. १४ जून २०१८ मध्ये भारतीय संघाने बंगळुरुच्या मैदानात अफगाणिस्तान विरुद्धचा कसोटी सामनाही दोन दिवसांत जिंकून दाखवला होता. कानपूरमधील परिस्थिती थोडी वेगळी असली तरी हा रेकॉर्ड टीम इंडियाला अजूनही संधी असल्याचा पुरावाच आहे.  
 

 

Web Title: India vs Bangladesh, 2nd Test Day 4 Mominul Haque's hundred guides Bangladesh to 205/6 at lunch on Day 4 How Team India Next Plan For Result Kanpur Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.