India vs Bangladesh, 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात रंगणार आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना नियोजित वेळेपेक्षा उशीरानं सुरु होणार आहे. पाऊस थांबला असला तरी मैदानातील ओलसरपणामुळे (Wet Outfield) सामन्याला विलंब झाला.
सामन्याला नियोजित वेळेपक्षा तासभर उशीर
सकाळी साडे नऊला पहिला चेंडू पडणं होत अपेक्षित, पण
हा सामना होणार का? असा प्रश्न निर्माण झाला असताना पंच ख्रिस ब्राउन आणि रिचर्ड केटलबरो या दोन पंचांनी खेळपट्टी आणि मैदानाचे निरीक्षण केल्यावर सकारात्मक माहिती समोर आली आहे. तासाभराच्या विलंबानंतर सकाळी १० वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात येतील. १० वाजून ३० मिनिटांनी पहिला चेंडू फेकला जाईल, हे स्पष्ट झाले.
कानपूरच्या मैदानात टीम इंडियाचं वर्चस्व
कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. इथं खेळलेल्या २३ कसोटी सामन्यात भारतीय संघाने ७ सामने जिंकले असून ३ सामने गमावले आहेत. ४१ वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजच्या संघाने या मैदानात भारतीय संघाला पराभूत केले होते. २०२१ मध्ये या मैदानात शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. न्यूझीलंड विरुद्धचा हा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला आणि अनिर्णित राहिलेला हा १३ वा कसोटी सामना होता.
ग्रीन पार्कवरील सांघिक धावसंख्येच्या रेकॉर्ड्सवर एक नजरकानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर संघाच्या सरासरी धावसंख्येचा विचार केला तर इथं पहिल्या डावात ३७० धावा, दुसऱ्या डावात ३२२ धावा आणि तिसऱ्या आणि चौथ्या डावात अनुक्रमे २५३ धावा आणि १३७ धावा असा रेकॉर्ड आहे. १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने या मैदानात ८ बाद ६७६ अशी सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. दुसरीकडे १९५९ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ या मैदानात अवघ्या १०५ धावांत ऑल आउट झाला होता. ही या मैदानातील निच्चांकी धावसंख्या आहेय