IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)

स्लिपमध्ये पुन्हा एकदा एक अप्रितम झेल टिपत त्याने फिल्डिंगचा सर्वोच्च दर्जा दाखवून दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:21 PM2024-09-27T12:21:13+5:302024-09-27T12:28:12+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 2nd Test Yashasvi Jaiswall Once Again Take Super Catch zakir hasan wicket by akash deep Video | IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)

IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Yashasvi Jaiswall Super Catch IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटी सामन्यात (Kanpur Test Match) आकाश दीपनं (Akash Deep)  भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिले. झाकिर हसनच्या रुपात मिळालेल्या या यशात यशस्वी जैस्वालनं मोलाची कामगिरी बजावली.  स्लिपमध्ये पुन्हा एकदा एक अप्रितम झेल टिपत त्याने फिल्डिंगचा सर्वोच्च दर्जा दाखवून दिला. 

आकाश दीपनं टीम इंडियाला मिळवून दिली पहिली विकेट

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या आठ षटकातच त्याने अश्विनच्या हाती चेंडू सोपवल्याचे दिसून आले. ही गोष्ट रोहित शर्माचा पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय फसलाय का? असा विचार करायला भाग पाडणारी होती. पण नवव्या षटकात आकाश दीप आला अन् त्याने कर्णधार रोहितनं घेतलेला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी संघाला पहिली विकेट मिळवून दिली. 

जैस्वालचा जबरदस्त प्रयत्न, सुपर कॅचसह पहिल्या विकेटमध्ये दिलं मोलाचा योगदान

आकाश दिप आपल्या पहिल्या ओव्हरमध्येट अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बांगलादेशच्या सलामीवीराला फसवण्यात यशस्वी झाला.  २४ चेंडूचा सामना करणाऱ्या झाकिरला त्याने खातेही उघडू दिले नाही. त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी आकाश दीपनं गुड लेंथवर गोलंदाजी करताना चेंडू अगदी चौथ्या स्टंपवर ठेवला. बांगलादेशच्या सलामीवीरानं अगदी बचावात्मक अंदाजात चेंडू खेळला. पण काही कळण्याच्या आत चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लीपच्या दिशेने गेला. यशस्वी जैस्वालनं डाईव्ह मारत या संधीच अगदी सोनं करून दाखवलं. चेन्नई कसोटी सामन्यातही यशस्वीनं एक अप्रतिम झेल घेतला होता. पुन्हा एकदा त्याने आपल्या क्षेत्ररक्षणातील दर्जा दाखवून दिला.

पुन्हा पुन्हा रिप्लाय पाहिल्यावर टीम इंडियाच्या बाजूनं आला निर्णय

हा कॅच झालाय की नाही, त्यासाठी मैदानातील पंचांना टिव्ही अंपायरची मदत घ्यावी लागली.  पुन्हा पुन्हा रिप्लाय पाहून  बराच वेळ घेतल्यानंतर जैस्वालचा प्रयत्न एकदम यशस्वी असल्याचे स्पष्ट झाले अन् टीम इंडियाच्या खात्यात पहिली विकेट जमा झाली. या विकेट्समुळे रोहित शर्मानं जो पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता त्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह हटण्यास मदत झाली.  
 

Web Title: India vs Bangladesh, 2nd Test Yashasvi Jaiswall Once Again Take Super Catch zakir hasan wicket by akash deep Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.