सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची ३ सामन्यांची टी २० मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी हैदराबादच्या मैदानात रंगणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
सगळं भारी, पण सलामी जोडीची दिसली समस्या
भारतीय संघाने या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. पण सलामी जोडीत थोडी गडबड दिसून आली. संजू सॅमसनला बढती देत या मालिकेत डावाला सुरुवात करण्याची संधी मिळाली होती. पण त्याच्या भात्यातून मोठी खेळी काही आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी एक बदलाचा प्रयोग टीम इंडियाकडून दिसू शकतो. संजू सॅमसन याने पहिल्या सामन्यात २९ तर दुसऱ्या सामन्यात १० धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर अभिषेक शर्मालाही मोठी खेळी करण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले. अभिषेकनं अनुक्रमे १५ आणि १६ अशा धावा केल्या होत्या.
कोण घेऊ शकतो संजूची जागा?
जर संघ व्यवस्थापनाने संजूच्या जागी बदलाचा प्रयोग केला तर विकेट किपर बॅटरच्या रुपात तिसऱ्या टी-२० सामन्यात जितेश शर्माला संधी मिळू शकते. जितेश शर्मा याने आयपीएलमध्ये आपल्या भात्यातील फटकेबाजीची क्षमता दाखवून दिली आहे. पण त्याला अद्याप ना आयपीएलमध्ये फिफ्टी झळकावता आलीये, ना टीम इंडियाकडून जलवा दाखवता आलाय. भारताकडून त्याला ९ सामन्यात संधी मिळाली आहे. यातील ७ डावात त्याच्या खात्यात १०० धावा जमा आहेत. ३५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. संधी मिळाली तर या बॅटरसमोरही स्वत:ला सिद्ध करण्याचे चॅलेंज असेल.
तिसऱ्या टी-३० साठी कशी असू शकते टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
जितेश शर्मा, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितेश कुमार रेड्डी, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, मयंक यादव.