बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने धावांची 'बरसात' करत अनेक विक्रम नोंदवल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ६ बाद २९७ धावा उभारल्या. ही भारताची टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावंसख्या आहे. एवढेच नाही तर कसोटी दर्जा असणाऱ्या संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये उभारलेली ही विक्रमी धावसंख्या ठरली. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा नेपाळ संघाच्या नावे आहे. या संघानं २०२३ मध्ये मंगोलिया विरुद्धच्या लढतीत ३ बाद ३१४ धाव केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता भारतीय संघाचा नंबर लागतो. याशिवाय भारतीय संघाने अनेक विक्रम नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
संजू सूर्यानं केली विक्रम तोडफोड करण्याला सुरुवात
बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. तंझिम हसन याने अभिषेक शर्माला अवघ्या ४ धावांवर तंबूत धाडत भारतीय संघालाअवघ्या २३ धावांवर पहिला धक्का दिला. पम त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार फलंदाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी रचत असताना या दोघांन पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला. एवढेच नाही तर संघाकडून सर्वात जलद शंभरीचा आकडा गाठण्याचा पराक्रमही नोंदवला. संजू सॅमसन याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिली सेंच्युरी आली. त्याने या सामन्यात ४७ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने १११ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवच्या भात्यातून ३५ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा आल्या. या दोघांच्या तुफान खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या १० षटकात १५२ धावा केल्या हा देखील एक रेकॉर्डच आहे.
रिंकूच्या उत्तुंग फटक्यासह सेट झाला सिक्सरचा रेकॉर्ड
भारताने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात जलद दोनशेचा पल्ला गाठण्याचा विक्रमी डावही साधला. अवघ्या ८४ चेंडूत टीम इंडियाने हे लक्ष्य पार केले होते. याशिवाय रिंकू सिंह याने भारताच्या डावातील २२ वा षटकार मारत टी-२० सामन्यात भारतीय संघ सर्वाधिक षटकार मारणारा संघही ठरला.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नोंदवलेले विक्रम
- एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रम- बांगलादेश विरुद्ध २२ षटकार
- पहिल्या १० ओव्हरमध्ये सर्वोत्तम धावसंख्या - १ बाद १५२
- संघाकडून सर्वात जलद शंभर धावांचा विक्रम- ४३ चेंडू
- पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा- १ बाद ८२ धावा