Join us  

रोहित शर्माचा विश्वास'घात'; KL राहुलपेक्षा खानचा पर्यायच ठरु शकतो छान!

लोकेश राहुल संधीच सोन करण्यात अपयश आले आहे. ही त्याच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 3:51 PM

Open in App

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी लोकेश राहुलनं गमावली आहे. ५२ चेंडूंचा सामना केल्यावर फक्त १६ धावा काढून तो बाद झाला. मॅचआधी रोहित शर्मानंलोकेश राहुलचं प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्कं असल्याचं स्पष्ट केले होते. एवढेच नाही तर त्या क्षमता सर्वांना ठाऊक आहे, असे म्हणत तो पुन्हा तोऱ्यात खेळेल, असा विश्वासही व्यक्त केला होता. पण पण रोहित शर्माचा विश्वास'घात' झालाय. लोकेश राहुल संधीच सोन करण्यात अपयश आले आहे. ही त्याच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. 

आधी KL राहुलवर भरवसा दाखवला, मग रोहितनं एक डाव असाही खेळला

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मानं लोकेश राहुलवर भरवसा दाखवला खरा. पण आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्यानंतर रोहितला त्याच्याकडे वळावे असे वाटले नाही. जिथं लोकेश राहुल फलंदाजीला येणं अपेक्षित होतं तिथं रिषभ पंतला प्रमोशन मिळालं. यशस्वी जैस्वाल हा डावखुरा फलंदाज आधीपासून मैदानात असताना लोकेश राहुलपेक्षा कॅप्टनला पंतला पाठवावे वाटलं. पंतला मिळालेले प्रमोशन हे लोकेश राहुलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारेच आहे. डावखुऱ्या फलंदाजांना गोलंदाजी टाकताना बांगलादेशचे गोलंदाजसंघर्ष करत होते, हा विचार रोहितनं हा डाव खेळला, असाही अंदाज बांधता येईल. पण डावाची सुरुवात करण्यापासून ते सहाव्या-सातव्या क्रमांकावर कुठंही फलंदाजी करण्यासाठी सक्षम असणाऱ्या लोकेश राहुलसाठी हे काही फार चांगले संकेत नाहीत. त्यात पंतनं प्लॅटफॉर्म सेट करूनही त्याला टीम इंडियाची गाडी काही पुढे नेता आली नाही. त्यामुळे लोकेश राहुलच्या टीम इंडियातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होऊ शकते.

विराट, रोहितसह शुबमनही फेल! मग केएल राहुलची जागाच का धोक्यात?

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि शुबमन गिल ही मंडळीही अपयशी ठरली.  पण तरीही लोकेश राहुलचं स्थान अधिक धोक्यात का? असा प्रश्नही पडू शकतो. यामागचं कारण आहे सर्फराज खान. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत सर्फराज खान याने आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. त्याला बाहेर ठेवून लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचं अपयश हे टीम इंडियाचे डोकेदुखी वाढवणारे आहेच. पण याशिवाय लोकेश राहुलच्या अडचणीतही भर टाकणारे आहे. 

सोशल मीडियावर KL राहुल होतोय ट्रोल 

लोकेश राहुल अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत आहेत. एकाने तर अश्विनची बॅटिंग बघून केएल राहुलच्या जागी त्यालाच बॅटिंगला पाठवावे, अशी कमेंट करत लोकेश राहुलला ट्रोल केले आहे.

भारत बांगलादेश यांच्यातील सामन्यात समालोचन करणाऱ्या तमिम इक्बाल यानेही लोकेश राहुलवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. ऑस्ट्रेलियातील एक खेळी सोडली तर दबावात लोकेश राहुलनं  दमदार खेळी केल्याचे आठवत नाही, असे तो म्हणाला आहे. या कमेंट्सच्या माध्यमातूनही चाहते लोकेश राहुलची शाळा घेताना दिसत आहेत.

 

टॅग्स :लोकेश राहुलरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ