भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. कोहलीनं 161 चेंडूंत 102 धावा करताना दिवस रात्र कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे 41वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटनं 188 डावांत 41 शतकं झळकावली, तर पाँटिंगला हा पल्ला गाठण्यासाठी 376 डाव खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 368 डावांत 33 शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे. पण, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला रोहित शर्मानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रोहितनं फलंदाजीचा सराव सोडून चक्का मध्यमगती गोलंदाजी केली.
पाहा व्हिडीओ...