Join us  

Ishan Kishan: इशान किशनच्या द्विशतकावर गर्लफ्रेंड अदिती फिदा, एकाच रिअ‍ॅक्शननं उडवून दिली खळबळ!

Ishan Kishan, Girlfriend: ईशान किशनने वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावल्याच्या आनंदात त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एवढी खुशझाली, की स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने आपल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 6:39 PM

Open in App

टीम इंडियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने आज एकदिवसीय सामन्यात ठोकलेल्या धडाकेबाज द्विशतकाने संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ 126 चेंडूत द्विशतक झळकावले. आपल्या खेळीत इशान किशनने 131 चेंडूत 210 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 24 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा इशान किशन हा चौथ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. इशान किशनच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनीही वनडे सामन्यात द्विशतक झळकावले आहे.

इशान किशनच्या द्विशतकावर त्याची गर्लफ्रेंड फिदा -ईशान किशनने वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावल्याच्या आनंदात त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एवढी खुशझाली, की स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने आपल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. अदितीने इशान किशनचा एक फोटो शेअर करताना त्यावर हार्ट आणि इमोशनल झाल्याचे इमोजी लावले आहे.

इशानच्या गर्लफ्रेंडने या रिएक्शनने उडवून दिली खळबळ - यानंतर, अदिती हुंडियाने इशान किशनचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. अदिती हुंडियाने BCCI च्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला इशान किशनचा आणखी एक फोटोही शेअर केला आहे. यात तो टीम इंडियाच्या जर्सित द्विशतक झळकावल्यानंतर बॅट उंचावताना दिसत आहे. इशान किशनची गर्लफ्रेड अदिती हुंडिया पेशाने एक मॉडेल आहे. तसेच ती सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

इशानच्या द्विशतकानिमित्त कोहलीने केलेला जल्लोष बांगलादेशचा संघही पाहतच राहिला. तिसऱ्या वनडे सामन्यात इशानने 131 चेंडूंचा सामना करत 210 धवांची जबरदस्त खेली केली. आपल्या खेळीत त्याने 24 चौका आणि 10 षटकारही लगावले. इशानने आपल्या सुरुवातीच्या 100 धावा 85 चेंडूत फटकावल्या. तर पुढच्या 100 धावा त्याने केवळ 41 चेंडूतच केल्या. याच वेळी इशानने विश्वविक्रमही केला आहे. आता तो जगातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे.

टॅग्स :इशान किशनभारत विरुद्ध बांगलादेश
Open in App