बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लढतील प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळतील हे अपेक्षित होते. त्यानुसार आज भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली. कुलदीप यादव आणि केदार जाधव यांना विश्रांती देण्याचा सल्ला घेण्यात आला.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कार्तिकचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न साकार झाले. 2004 साली म्हणजे त्याने भारताच्या संघातून पदार्पण केले. म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्याही आधी. त्यानंतर 2007 , 2011 आणि 2015 असे तीन वर्ल्ड कप झाले. पण कार्तिकला संधी मिळालीच नाही.
यंदाही धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून कार्तिकचेर निवड झाली. पण त्याला संधी मिळणे अवघडच होते. त्यामुळे वर्ल्ड कप खेळण्याचे त्याचे अपूर्ण राहते की काय असे वाटत होते. पण अखेरीस त्याला संधी मिळाली.