लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे, तर शर्यतीत कायम राहण्यासाठी बांगलादेशसाठी हा सामना करो वा मरो असाच आहे. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.बांगलादेशने आतापर्यंत दमदार कामगिरी केलेली आहे, त्यांना विजयामध्ये रुपांतर करता आले नसले तरी ते कडवी टक्कर देऊ शकतात. त्यामुळे आजच्या सामन्याची उत्सुकता आहे. मुंबईत पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे अनेकांना सुट्टी मिळाल्याने मित्रांसोबत भारत- बांगलादेश सामना पाहण्याचे प्लानिंगही सुरू झाले असेल. पण मुंबईप्रमाणे बर्मिंगहॅम येथे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतीय संघ ११ गुणांसह सध्या दुसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशच्या खात्यात ७ गुण आहेत. त्यामुळे बांगलादेशला उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवावे लागणार आहेत. या सामन्यात पावसाची शक्यता नाही. येथील तापमान २१ डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्यामुळे टेंशन घेऊ नका हा सामना मित्रांसोबत पाहण्याचे बिनधास्त प्लानिंग करा.