बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले. यंदाच्या विश्वचषकातील त्याचे हे चौथे शतक ठरले. हे शतक पूर्ण करण्यापूर्वी रोहितने एक इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे.
या सामन्यात शतकी खेळी साकारताना रोहितने तब्बल पाच षटकार लगावले. या पाच षटकारांसह रोहितने धोनीला पिछाडीवर टाकले आहे. हे पाच षटकार लगावत रोहित हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 238 षटकार लगावले होते. रोहितने हा विक्रम आता मोडीत काढला आहे.
हा वर्ल्ड कप रोहितसाठी खूपच खास आहे. त्याने आतापर्यंत तीन शतकी खेळी केल्या होत्या आणि भारताकडून सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत. रोहितने चौथी धाव घेताच 2019 मध्ये वन डे क्रिकेटध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. यंदाच्या वर्षात त्याने 55 + च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. ॲरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांच्या नंतर चालू वर्षात 1000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने चौथी धाव घेताच नावावर विक्रम केला. 2019 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला तिसरा फलंदाज ठरला.
धोनीच्या आधी टीम इंडियात आला, पण आज पहिला वर्ल्ड कप सामना खेळणारभारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लढतील प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळतील हे अपेक्षित होते. त्यानुसार आज भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली. कुलदीप यादव आणि केदार जाधव यांना विश्रांती देण्याचा सल्ला घेण्यात आला.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कार्तिकचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न साकार झाले. 2004 साली म्हणजे त्याने भारताच्या संघातून पदार्पण केले. म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्याही आधी. त्यानंतर 2007 , 2011 आणि 2015 असे तीन वर्ल्ड कप झाले. पण कार्तिकला संधी मिळालीच नाही.