बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने चौथी धाव घेताच नावावर विक्रम केला. 2019 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला तिसरा फलंदाज ठरला.
हे वर्ल्ड कप रोहितसाठी खूपच खास आहे. त्याने आतापर्यंत तीन शतकी खेळी केल्या आहेत आणि भारताकडून सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत. रोहितने चौथी धाव घेताच 2019 मध्ये वन डे क्रिकेटध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. यंदाच्या वर्षात त्याने 55 + च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. ॲरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांच्या नंतर चालू वर्षात 1000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
रोहितने 2013 मध्ये 1196, 2017 मध्ये 1293, 2018 मध्ये 1030 धावा केल्या होत्या.