बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्मा विश्वचषकात 'टॉप'वर पोहोचला आहे. या खेळीनंतर रोहित विश्वचषकातील शिखरावर पोहोचला आहे. या सामन्यात रोहितने काही विक्रम रचत असताना ही दमदार कामगिरीही केली आहे.
यंदाच्या विश्वचषकातील रोहितचे हे तिसरे शतक ठरले. त्याचबरोबर रोहितने अक अर्धशतकही झळकावले आहे. या सामन्यातील शतकासह रोहितने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या नावावर या विश्वचषकात सर्वाधिक 544 धावा झाल्या आहेत. हा अव्वल क्रमांक पटकावताना रोहितने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पिछाडीवर टाकले आहे.
हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास, धोनीलाही टाकले मागेबांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले. यंदाच्या विश्वचषकातील त्याचे हे चौथे शतक ठरले. हे शतक पूर्ण करण्यापूर्वी रोहितने एक इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे.
या सामन्यात शतकी खेळी साकारताना रोहितने तब्बल पाच षटकार लगावले. या पाच षटकारांसह रोहितने धोनीला पिछाडीवर टाकले आहे. हे पाच षटकार लगावत रोहित हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 238 षटकार लगावले होते. रोहितने हा विक्रम आता मोडीत काढला आहे.
हा वर्ल्ड कप रोहितसाठी खूपच खास आहे. त्याने आतापर्यंत तीन शतकी खेळी केल्या होत्या आणि भारताकडून सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत. रोहितने चौथी धाव घेताच 2019 मध्ये वन डे क्रिकेटध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. यंदाच्या वर्षात त्याने 55 + च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. ॲरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांच्या नंतर चालू वर्षात 1000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने चौथी धाव घेताच नावावर विक्रम केला. 2019 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला तिसरा फलंदाज ठरला.