एकदा, दोनदा वाचला; शाकिबने बघून घेतला अन् सूर्यकुमारचा 'दांडा'च उडवला, ५ विकेट पडल्या

India vs Bangladesh Live Marathi : बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय धावसंख्येवर चांगला लगाम लावलेला पाहयला मिळतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 09:43 PM2023-09-15T21:43:27+5:302023-09-15T21:44:51+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh Live Marathi : Captain Shakib Al Hasan gets the big wicket, Suryakumar Yadav departs for 26 off 34 balls, India lose their 5th wicket 139. | एकदा, दोनदा वाचला; शाकिबने बघून घेतला अन् सूर्यकुमारचा 'दांडा'च उडवला, ५ विकेट पडल्या

एकदा, दोनदा वाचला; शाकिबने बघून घेतला अन् सूर्यकुमारचा 'दांडा'च उडवला, ५ विकेट पडल्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh Live Marathi : बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय धावसंख्येवर चांगला लगाम लावलेला पाहयला मिळतोय. विराट कोहली, हार्दिक पांड्या हे अनुभवी फलंदाज विश्रांतीवर असताना तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज संधी दिली गेली. पण, बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर यांना अपयश आले. सूर्यकुमार फिरकी गोलंदाजांना स्वीप मारण्याच्या प्रयत्नात अनेकदा थोडक्यात वाचला. पण, हे सर्व कर्णधार शाकिब अल हसनने पाहिले अन् एकच सरळ चेंडू टाकून सूर्याचा दांडा उडवला. भारताचा निम्मा संघ १३९ धावांत परतला. 

१३ Six, १३ Fours: हेनरिच क्लासेनने ऑस्ट्रेलियाची वाट लावली, डेव्हिड मीलरसह 'किलर' खेळ, ४१६ धावा! 


शाकिब अल हसन ( ८०) व तोवहिद हृदोय ( ५४) यांनी १०१ धावांची भागीदारी केली आणि त्यामुळे ४ बाद ५९ धावांवरून बांगलादेशला मोठी मजल मारून दिली. लिटन दास ( ०), तांझीद हसन ( १३), अनामुल हक ( ४)  आणि मेहिदी हसन मिराज ( १३) हे ५९ धावांवर माघारी परतले. शाकिबने ८५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ८० धावा केल्या. हृदोय ८१ चेंडूंत ५४ धावांवर झेलबाद झाला. नासूम अहमदने ४५ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४४ धावा करून संघाला ८ बाद २६५ धावांपर्यंत पोहोचवले. शार्दूल ठाकूरने ३, मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या. 


रोहित शर्मा शून्यावर माघारी, तंझीम हसन साकिबने बांगलादेशला मोठी विकेट मिळवून दिली. पदार्पणवीर तिकल वर्माही ( ५) साकिबच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि भारताला १७ धावांवर दुसरा धक्का बसला. लोकेश राहुल व शुबमन गिल यांनी ८७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला होता, परंतु महेदी हसनने ही जोडी तोडली. इशान किशनही ( ५) फार काही करू शकला नाही आणि मेहीदी मिराजने त्याला बाद केले. शुबमनने चांगली खिंड लढवली होती. भारताला २० षटकांत १४० धावा हव्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि शुबमन यांनी ४५ धावांची भागीदारी केली खरी, परंतु सूर्या फिरकीपटूंना स्वीप मारताना चाचपडताना दिसला. शाकिबने करेक्ट कार्यक्रम करून सूर्याचा ( २६) त्रिफळा उडवला. 

 

Web Title: India vs Bangladesh Live Marathi : Captain Shakib Al Hasan gets the big wicket, Suryakumar Yadav departs for 26 off 34 balls, India lose their 5th wicket 139.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.