India vs Bangladesh Live Marathi : बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर भारताचे इतर फलंदाज ढेपाळले असताना युवा फलंदाज शुबमन गिलने ( Shubman Gill) शतक झळकावून भारताला विजयपथावर कायम ठेवले. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांना आज संधीचं सोनं करता नाही आलं. रोहित शर्मा भोपळ्यावर माघारी परतला, तर इशान किशनही एकेरी धावांवर माघारी परतला. शुबमनने या वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडला आणि यंदाच्या वर्षात असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने ११७ चेंडूंत शतक पूर्ण केले. भारताला 11 षटकांत 83 धावा करायच्या आहेत आणि त्यांनी 6 फलंदाज गमावले आहेत.
एकदा, दोनदा वाचला; शाकिबने बघून घेतला अन् सूर्यकुमारचा 'दांडा'च उडवला, ५ विकेट पडल्या
रोहित शर्मा ( ०), तिलक वर्मा ( ५), इशान किशन ( ५) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल व शुबमन गिल यांनी ८७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. महेदी हसनने ही जोडी तोडताना लोकेशला ( १९) माघारी पाठवले. पण, शुबमनने चांगली खिंड लढवली. सूर्यकुमार यादव आणि शुबमन यांनी ४५ धावांची भागीदारी केली खरी, परंतु सूर्या फिरकीपटूंना स्वीप मारताना चाचपडताना दिसला. शाकिबने करेक्ट कार्यक्रम करून सूर्याचा ( २६) त्रिफळा उडवला. शुबमनने संघावर दडपण येऊ नये यासाठी जोरदार फटकेबाजी सुरू केली. रवींद्र जडेजाच्या कॉलवर धाव घेणं महागात पडले असते, परंतु नशीबाने तो रन आऊट होता होता वाचला. पण, जडेजाने ( ७) मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर विकेट टाकली.