Join us  

श्रेयस अय्यरला घ्यावी लागेल वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स 

India vs Bangladesh Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आज बांगलादेशचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 3:27 PM

Open in App

India vs Bangladesh Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आज बांगलादेशचा सामना करत आहे. भारताने आधीच फायनलमध्ये प्रवेश निश्चित केल्यामुळे बांगलादेशविरुद्धची मॅच ही केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे भारताने आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले आहेत. वेस्ट इंडिज मालिकेतून ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला वन डेत पदार्पणाची संधी मिळालीय. सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा हे ४ उर्वरित बदल संघात आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांना आज विश्रांती दिली गेली आहे. पण, या सर्व नावांमध्ये श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) हे नाव पुन्हा गायब असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतोय. त्यात BCCI ने महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.

मार्च २०२३ नंतर श्रेयस आंततराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला बाहेर रहावे लागले होते आणि त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रेयस हा भारताचा मधळ्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू आहे. आशिया चषक स्पर्धेतून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने पुनरागमन केले आणि १४ धावा केल्या. नेपाळविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण, पाकिस्तान विरुद्धच्या सुपर ४ मधील लढतीपूर्वी त्याच्या पाठीत उसण भरल्याचे सांगण्यात आले आणि तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर गेला. श्रीलंकेविरुद्धही त्याला संधी मिळाली नाही आणि आजही तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. 

काल त्याने नेट्समध्ये २० मिनिटे फलंदाजी केली होती आणि आज तो संघात परतेल अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. इथे रोहित शर्मा नाणेफेक करत असताना फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासोबत श्रेयस नेट्समध्ये सराव करताना दिसला. तो फिट आहे, मग संघात का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर बीसीसीआयने उत्तर दिले की, श्रेयस अय्यर अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्याच्यात सुधारणा आहे.''

आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खरबदारीचा उपाय म्हणून आज तिलक वर्माची चाचपणी केली जात आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी श्रेयस पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास, त्याचे वर्ल्ड कपचे तिकीट रद्द होऊ शकते. २५ सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड कप संघात बदल करता येणार आहे. 

टॅग्स :एशिया कप 2023श्रेयस अय्यरवन डे वर्ल्ड कपबीसीसीआय