Join us  

Funny Video : विराट कोहली सहकाऱ्यांसाठी बनला 'वॉटर बॉय'; उड्या मारत मैदानावर एन्ट्री 

India vs Bangladesh Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आज बांगलादेशचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 3:51 PM

Open in App

India vs Bangladesh Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आज बांगलादेशचा सामना करत आहे. भारताने आधीच फायनलमध्ये प्रवेश निश्चित केल्यामुळे बांगलादेशविरुद्धची मॅच ही केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे भारताने आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी रोहित शर्माचा हा निर्णय सार्थ ठरवला. शार्दूल ठाकूरने २ व मोहम्मद शमीने १ विकेट घेत बांगलादेशला २८ धावांत ३ धक्के दिले आहेत. दरम्यान, विश्रांतीवर असलेल्या विराट कोहलीचा ( Virat Kohli) एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 वेस्ट इंडिज मालिकेतून ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला वन डेत पदार्पणाची संधी मिळालीय. सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा हे ४ उर्वरित बदल संघात आहेत. विराट, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांना आज विश्रांती दिली गेली आहे. श्रेयस अय्यर अजूनही दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर लिटन दासचा ( ०) त्रिफळा उडवला. त्यानंतर चौथ्या षटकात शार्दूलने टाकलेल्या चेंडूने तांझीद हसनच्या बॅटची किनार घेतली अन् यष्टींवर आदळला. शार्दूलने आणखी एक धक्का देताना अनामुल हकला झेलबाद केले अन् बांगलादेशची अवस्था ५.४ षटकांत ३ बाद २८ अशी झाली.

दरम्यान, विश्रांतीवर असलेला विराट कोहली सहकाऱ्यांसाठी पाणी आणताना दिसला. येथेही विराटचा मस्करीचा स्वभाव सुटला नाही आणि तो उड्या मारत मैदानावर पाणी घेऊन आल्याने सहकाऱ्यांनाही हसू आवरले नाही. 

 

टॅग्स :एशिया कप 2023विराट कोहलीभारत विरुद्ध बांगलादेशऑफ द फिल्ड