Team India Announced, IND vs BAN T20 Series: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने शनिवारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ सामन्यांची टी२० मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसह टी२० संघ दोन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर मैदानात परतणार आहे. यापूर्वी, टीम इंडियाने जुलैच्या शेवटी श्रीलंका दौऱ्यावर टी२० मालिका खेळली होती. त्या मालिकेतील अनेक खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे. पण या संघात २ नव्या खेळाडूंना प्रथमच टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तर एका गोलंदाजाने तब्बल ३ वर्षानी टीम इंडियात पुनरागमन केले आहे.
दोन नवख्या खेळाडूंना संघात पदार्पणाची संधी
IPL स्टार मयंक यादवला संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यालाही प्रथमच टीम इंडियात स्थान मिळाले आहे. तर शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज या प्रमुख खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. ते सध्या कसोटी मालिकेचा भाग आहेत आणि होणार नाहीत. त्यानंतर काही काळ ब्रेक दिला जाणार आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे, अपेक्षा असतानाही स्टार यष्टीरक्षक इशान किशनची मात्र संघात निवड झालेली नाही.
३ वर्षांनी या खेळाडूचं संघात 'कमबॅक'
इशान परतला नाही पण तब्बल ३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती टीम इंडियात परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल चॅम्पियन बनवण्यात वरुण चक्रवर्तीची महत्त्वाची भूमिका होती. २०२१च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याची पहिल्यांदाच संघात निवड करण्यात आली होती. तिथे त्याची कामगिरी खराब होती आणि तो फिटनेसच्या बाबतीतही फारसा प्रभावी दिसला नव्हता. अशा स्थितीत त्याला संघातून वगळण्यात आले होते. पण आता त्याला संघात स्थान मिळाले आहे.
Web Title: India vs Bangladesh T20I series Team India announced IPL star Mayank Yadav Nitish Kumar Reddy gets maiden call up Sanju Samson included
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.