भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांना 148 धावाच करता आल्या. सौम्या सरकार - मुश्फिकर रहीम यांनी भारताच्या चमूत तणाव निर्माण केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या हातून सामना खेचून आणला. रहीमनं अर्धशतकी खेळी करताना बांगलादेशला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतावर पहिला विजय मिळवून दिला. बांगलादेशनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशनं 7 विकेटनं हा सामना जिंकला. नवव्या प्रयत्नांत बांगलादेशला टीम इंडियाला ट्वेंटी-20त पहिल्यांदा नमवण्यात यश आले. बांगलादेशनं नवी दिल्लीत इतिहास घडवला असला तरी त्यांच्या खेळाडूंना येथील प्रदुषणाचा त्रास झाला.
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. दिल्ली सध्या वायू प्रदुषणाच्या समस्येला सामोरी जात आहे. येथील वाढलेल्या वायू प्रदुषणामुळे राजकारण तापले आहेत. त्यामुळे या सामन्यावरही अनिश्चिततेचं सावट होतं. पण, तरीही हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यापूर्वी बांगलादेशचे खेळाडू तोंडावर मास्क लावून सराव करताना दिसले होते. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या खेळाडूंना उलटीचा त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. या खेळाडूंमध्ये सौम्या सरकारचाही समावेश असल्याचे समजते आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी वायू प्रदुषणावर चिंता व्यक्त केली होती.
दुसऱ्या टी२० सामन्यावर चक्रीवादळाचे सावटदिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे प्रभावित पहिल्या ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी येथे खेळल्या जाणाºया दुसºया लढतीवर चक्रीवादळाचे सावट आहे. चक्रीवादळ ‘महा’ गुरुवारी गुजरातच्या समुद्र किनाºयावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या भाकीतानुसार ‘महा’ पोरबंदर व दीव दरम्यान गुरुवारी पहाटे वादळच्या रुपाने गुजरातच्या किनाऱ्यावर दाखल होईल.