भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. रोहित शर्माच्या तुफानी 85 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-20त सहज विजय मिळवला. बांगलादेशचे 154 धावांचे लक्ष्य भारतानं 15.4 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. रोहितनं 43 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून 85 धावा चोपल्या. या सामन्यात रोहितनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. एका वर्षांत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम... रोहितने २०१९ मध्ये ६५* आंतरराष्ट्रीय षटकार खेचले आहेत. २०१८ मध्ये त्याने ७४, तर २०१७ मध्ये ६५ षटकार खेचले होते. रोहितच्या या दमदार खेळीचं मुंबई इंडियन्सनं अनोख्या रितीनं कौतुक केलं. मुंबई इंडियन्सचे रोहितनं टोलावलेला षटकारावरून सोशल मीडियावर एक अफवा पसरवली... आता काय आहे ती अफवा हे जाणून घेऊया....
बांगलादेशनं लिटन दास ( 29), मोहम्मद नईम ( 36), सौम्या सरकार ( 30) आणि कर्णधार महमदुल्लाह (30) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 6 बाद 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित व शिखर धवन यांनी 118 धावांची भागीदारी करताना विक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 वेळा शतकी भागीदारीचा विक्रम रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं नावावर केला. त्यांनी डेव्हिड वॉर्नर- शेन वॉटसन, मार्टिन गुप्तील-केन विलियम्सन आणि रोहित-विराट कोहली यांचा 3 शतकी भागीदारीचा विक्रम मोडला. रोहित शर्मानं एका ट्वेंटी-२० सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ८ वेळा मारले आहेत. या विक्रमात ख्रिस गेल व कॉलीन मुन्रो ( ९ ) संयुक्तपणे आघाडीवर आहेत.