India vs Bangladesh : द्विशतक इशानचे अन् भन्नाट सेलिब्रेशन केले विराटने! भांगडा करतानाचा VIDEO व्हायरल

इशानच्या द्विशतकानिमित्त कोहलीने केलेला जल्लोष बांगलादेशचा संघही पाहतच राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 05:34 PM2022-12-10T17:34:34+5:302022-12-10T17:35:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs bangladesh virat kohli celebrated ishan kishan double century watch the virat kohli bhangra dance | India vs Bangladesh : द्विशतक इशानचे अन् भन्नाट सेलिब्रेशन केले विराटने! भांगडा करतानाचा VIDEO व्हायरल

India vs Bangladesh : द्विशतक इशानचे अन् भन्नाट सेलिब्रेशन केले विराटने! भांगडा करतानाचा VIDEO व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा धडाकेबाज फलंदाज इशान किशनने आज बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले आहे. त्यांने मुस्तफिझूर रहमानच्या 35व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि संपूर्ण मैदान उठून उभे राहिले. यानंतर त्यानेही हेल्मेट काढून आपल्या द्विशतकाचा आनंद साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत दुसऱ्या बाजूला विराट कोहली उभा होता. कोहलीही इशान किशनच्या द्विशतकाची आतूरतेने वाट पाहत होता आणि त्याच्या 200 धावा पूर्ण होताच कोहलीनेही संपूर्ण जोशात आनंद साजरा केला. एवढेच नाही, तर तो खेळपट्टीवरच इशानसोबत भांगडा करतानाही दिसला.

इशानच्या द्विशतकानिमित्त कोहलीने केलेला जल्लोष बांगलादेशचा संघही पाहतच राहिला. तिसऱ्या वनडे सामन्यात इशानने 131 चेंडूंचा सामना करत 210 धवांची जबरदस्त खेली केली. आपल्या खेळीत त्याने 24 चौका आणि 10 षटकारही लगावले. इशानने आपल्या सुरुवातीच्या 100 धावा 85 चेंडूत फटकावल्या. तर पुढच्या 100 धावा त्याने केवळ 41 चेंडूतच केल्या.

इशानचा विश्वविक्रम - 
याच वेळी इशानने विश्वविक्रमही केला आहे. आता तो जगातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने केवळ 126 चेंडूत हा पराक्रम केला. तसेच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनेही शतक ठोकले आहे.

विराटने सचिन आणि पाँटिंगचा विक्रम मोडला -  
विराटने ऑगस्ट २०१९नंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. जवळपास १२०० हून अधिक दिवसानंतर विराटने शतक झळकावले आणि रिकी पाँटिंग व सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले. विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४४ वे शतक ठरले. त्याने सर्वात कमी २५६ डावांत ४४ शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या ४१८ डावांत ४४ शतकांचा विक्रम मोडला. विराट ९१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११३ धावांवर माघारी परतला.  विराटचे हे ७२वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आणि त्याने पाँटिंगला ( ७१) मागे टाकले.  इशान - विराट माघारी परतल्यावर भारताच्या धावगतीला लगाम लागली, परंतु संघाने वन डे क्रिकेटमध्या सहाव्यांदा ४०० + धावा केल्या. आफ्रिकेनेही सहा वेळा असा पराक्रम केला आहे. ८ वर्षांनंतर भारताने वन डे क्रिकेटमध्ये ४०० + धावा केल्या. 
 

Web Title: India vs bangladesh virat kohli celebrated ishan kishan double century watch the virat kohli bhangra dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.