Join us  

India vs County XI: नव्या पोरांसमोर टीम इंडियाचे दिग्गज 311 धावांत तंबूत; दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजाची सामन्यातून माघार 

India vs County XI practice game : इंग्लंडचा कसोटी मालिकेत सामना करण्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यात आपली ताकद आजमावत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 4:40 PM

Open in App
ठळक मुद्देराहुल माघारी परतला तेव्हा टीम इंडियाच्या ५ बाद २३४ धावा झाल्या होत्या. त्यानंतर रवींद्र जडेजानं १४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७५ धावा केल्या.

India vs County XI practice game : इंग्लंडचा कसोटी मालिकेत सामना करण्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यात आपली ताकद आजमावत आहे. कौंटी एकादशविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारताचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्याशिवाय मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची अवस्था 3 बाद 67 धावा अशी झाली होती. पण, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सारवला, तरीही कौंटी एकादशच्या नव्या पोरांसमोर टीम इंडियाच्या दिग्गजांना 311 धावा करता आल्या. पहिल्या दिवसाच्या 9 बाद 309 धावांवरून आज सुरूवात करताना टीम इंडियाला दोन धावाच जोडता आल्या. क्रेग माईल्सनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.  

 इंग्लंडनं वन डे पाठोपाठ ट्वेंटी-20तही पाकिस्तानची जिरवली अन् स्टेडियमवर रंगला इश्काचा खेळ, Video 

मयांक अग्रवाल व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. लिंडन जेम्सनं या दोघांनाही स्वस्तात माघारी पाठवले. रोहित शर्मा ३३ चेंडूंत ९ धावांवर आणि मयांक अग्रवाल ३५ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी ही जोडी टीम इंडियाला सावरेल असे वाटत असताना पुजारा २१ धावांवर यष्टिचीत होऊन बाद झाला. विहारीनेही २४ धावांवर विकेट टाकली. पण, लोकेश राहुलरवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लोकेश १५० चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावांवर रिटायर्ड झाला. भारतानं ४ बाद १०७ वरून २३४ धावांपर्यंत मजल मारली आहे. जडेजा व शार्दूल ठाकूर मैदानावर आहेत. अन्य फलंदाजांना संधी मिळावी म्हणून लोकेश रिटायर्ड झाला. 

राहुल माघारी परतला तेव्हा टीम इंडियाच्या ५ बाद २३४ धावा झाल्या होत्या. त्यानंतर रवींद्र जडेजानं १४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७५ धावा केल्या. शार्दूलनं २० धावांची खेळी केली. दिवसअखेर भारतानं ९ फलंदाज गमावत ३०६ धावा केल्या होत्या. क्रेगनं आज 10 वी विकेट घेतली. लिंडन जेम्स व लाएम पॅटर्सन-व्हाईट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

आवेश खान दुखापतग्रस्त, सराव सामन्यातून माघारया सामन्यात टीम इंडियाचे दोन शिलेदार वॉशिंग्टन सूंदर आणि आवेश खान हे कौंटी एकादशकडून खेळले. पण, आवेशच्या अंगठ्याला दुखापत झाली अन् त्यानं पहिल्याच दिवशी मैदान सोडले. दुसऱ्या दिवशीही तो मैदानावर उतरला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर उपचार करत आहे. त्यानं सराव सामन्यातून माघार घेतल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलरवींद्र जडेजा