India vs County XI: Beautiful delivery from Umesh Yadav : लोकेश राहुलचे शतक अन् रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या डावात 311 धावा केल्या. विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्याशिवाय मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची अवस्था 3 बाद 67 धावा अशी झाली होती. पण, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सारवला, तरीही कौंटी एकादशच्या नव्या पोरांसमोर टीम इंडियाच्या दिग्गजांना 311 धावा करता आल्या. पहिल्या दिवसाच्या 9 बाद 309 धावांवरून आज सुरूवात करताना टीम इंडियाला दोन धावाच जोडता आल्या. क्रेग माईल्सनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या कौंटी एकादश संघाला उमेश यादवनं दोन धक्के दिले. उमेशनं घेतलेली दुसरी विकेट ही अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरत आहे.
2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन?
मयांक अग्रवाल व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा ३३ चेंडूंत ९ धावांवर आणि मयांक अग्रवाल ३५ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी ही जोडी टीम इंडियाला सावरेल असे वाटत असताना पुजारा २१ धावांवर यष्टिचीत होऊन बाद झाला. विहारीनेही २४ धावांवर विकेट टाकली. पण, लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लोकेश १५० चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून १०१ धावांवर रिटायर्ड झाला. त्यानंतर रवींद्र जडेजानं १४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७५ धावा केल्या.
उमेश यादवनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. जॅक लिब्बी 12 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे रोबर्ट याटेस ( 1) व वॉशिंग्टन सुंदर ( 1) यांना माघारी पाठवले. उमेशनं दुसरी विकेट घेताना कर्णधार विल ऱ्होड्सला ( 11) बाद केले. पण, त्याची विकेट नक्की कशी पडली याचा अंदाच पहिल्यांदा व्हिडीओ पाहताना अनेकांचा चुकतोय... भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडच्या संघात स्थान पटकावणारा हसीब हमीद 129 चेंडूंत 42 धावांवर खेळत आहे. कौंटी एकादशचे 4 फलंदाज 76 धावांवर माघारी परतले आहेत.
पाहा व्हिडीओ...