बर्मिंगहॅम - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या अँड्य्रू फ्लिंटॉफने टी-शर्ट काढून केलेल्या जल्लोषाला सौरभ गांगुलीने जशास तसे उत्तर दिले. वन डे मालिकेतील विजयानंतर लॉर्डच्या ऐतिहासिक गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट उतरवले. इंग्लंड आणि भारत या संघांमधील मैदानावरील ठसन आजही सुरूच आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत याची प्रचिती आली. यावेळी ही ठसन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांच्यात पाहायला मिळाली.
गांगुलीप्रमाणे विराटही आक्रमक आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी विराटने सुरेख क्षेत्ररक्षण करताना रूटला धावबाद केले आणि त्यांनतर त्याने रूटला डीवचण्याची क्रिया केली. 63व्या षटकातील तिस-या चेंडूवर जॉनी बेअरस्टोव्हने डाव्या बाजूला चेंडू टोलावला आणि तो अडवण्यासाठी कोहली धावला. त्याने एका हातावर स्वतःला बॅलेन्स करताना अश्विनच्या दिशेने थ्रो केला आणि रूट धावबाद झाला. त्यानंतर आनंद साजरा करताना कोहलीने इंग्लंडच्या कर्णधाराली डिवचले.. पाहा कोहलीने काय केले...