India vs England, 1st ODI, Pune: भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या सॅम बिलिंग्ज (Sam Billings) याला क्षेत्ररक्षण करताना जबर दुखापत झाली आहे. भारतीय संघाचा सलामीवर शिखर धवन यानं लगावलेल्या खणखणीत फटक्यानंतर चेंडू अडवताना सॅम बिलिंग्जला दुखापत झाली. त्यांच्या खांद्याच्या हाडाला दुखापत झाल्यानं सामन्यात तो फलंदाजी करण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगितलं जात आहे. (india vs england 1st odi updates sam billings injury scare on english team)
जखमी होऊनही रोहित शर्मा खेळत राहिला, शिखर धवनसह सचिन-वीरूचा मोठा विक्रम मोडला
सामन्याच्या ३३ व्या षटकात डीप स्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करत असताना शिखर धवननं लगावलेला फटका चौकार होऊ नये यासाठी सॅम बिलिंग्जनं झेप घेऊन चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडविण्यात त्याला यशही आलं पण खांद्याला झालेल्या दुखापतीनं तो मैदानातच व्हिवळताना दिसला. त्याचा उठता देखील येत नव्हतं. त्यानं चेंडू अडवला खरा पण त्यावेळी त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाल्याचं रिव्ह्यूमध्ये लक्षात आलं. त्यामुळे पंचांनी चौकार घोषीत केला.
विराट कोहलीचा मोठा विक्रम, सचिन तेंडुलकरनंतर 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय
मैदानात फिजिओनं येऊन सॅम बिलिंग्जच्या दुखापतीची विचारपूस केली आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये घेऊन जाण्यात आलं. सॅम बिलिंग्जच्या खांद्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. लवकरच तो पुन्हा मैदानात खेळताना दिसेल अशी आशा आहे, अशी माहिती इंग्लंडच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
Web Title: india vs england 1st odi updates sam billings injury scare on english team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.