India vs England, 1st Test : जो रूट, जो रूट अन् जो रूट... चेन्नई कसोटीत एकच नाव सध्या चर्चेत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून आलेली टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडवर वर्चस्व गाजवतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, भारतात येण्यापूर्वी आशियाई खेळपट्टीचा श्रीलंकेत जाऊन चांगलाच अभ्यास केलेल्या जो रूटनं ( Joe Root) गोलंदाजांना चांगलेच सतावलं. १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या रूटनं चेन्नईवर २१८ धावांची खेळी करताना विश्वविक्रम नोंदवला. बेन स्टोक्सनंही ( Ben Stokes) तुफान फटकेबाजी करून ८२ धावा कुटल्या. इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी ८ बाद ५५५ धावा केल्या. १००व्या कसोटीत जो रूटचा World Record!; सुनील गावस्कर यांचाही मोडला विक्रम
मॅचचे हायलाईट्स. - बेन स्टोक्स आणि रूट या जोडीनं चौथ्या विकेटसाठी २२१ चेंडूंत १२४ धावांची भागीदारी केली. १२७व्या षटकात भारताला रूट व स्टोक्सची जोडी तोडण्यात यश आलं. नदीमच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टोक्स चेतेश्वर पुजाराच्या हातून झेलबाद झाला.
- तत्पूर्वी रुटनं तिसऱ्या विकेटसाठी डॉम सिब्लीसह २०० धावा जोडल्या होत्या. इंग्लंडनं कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारतात तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी एकाच डावात शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला. यापूर्वी त्यांनी पाच वेळा भारताविरुद्ध अशी कामगिरी केली होती, परंतु त्या सर्व त्यांच्या देशात. २०११ ( एडबस्टन व ट्रेंट ब्रीज), १९९० ( लॉर्ड्स), १९७९ ( एडबस्टन) व १९६७ ( हेडिंग्ली) येथे त्यांनी ही कामगिरी केली होती. इंग्लंडच्या दिग्गज 'कॅप्टन मूर' यांचा कोरोनानं मृत्यू; चेन्नई कसोटीवरही शोककळा
- बेन स्टोक्स ११८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकार खेचून ८२ धावांवर माघारी परतला. इंग्लंडनं २००४ ( दक्षिण आफ्रिका) व २००५ ( पाकिस्तान) सालानंतर प्रथमच परदेशात पहिल्या डावात ४००+ धावा करण्याचा पराक्रम आज केला.
- १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा रुट हा जगातला पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी १००व्या कसोटीत इंझमाम उल हक याची नाबाद १८८ धावांची खेळी सर्वोत्तम कामगिरी होती. जो रुटचे हे पाचवे कसोटी द्विशतक आहे आणि कर्णधार म्हणून तिसरे. टीम इंडियाचं काही खरं नाही!; १६ वर्षांनंतर इंग्लंडनं करून दाखवला 'हा' भारी पराक्रम!
- त्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) तीनही DRS चुकीचा निर्णय घेऊन गमावल्याचा फटका बसला. भारताने पहिल्या डावातील सर्व DRS दुसऱ्या सत्रातच गमावले होते. त्यात दोन झेल सुटले व एक सोपा रन आऊटही भारतीय क्षेत्ररक्षकांना करता आला नाही.
- १५४व्या षटकात जो रूटची विकेट मिळवण्यात टीम इंडियाला अखेर यश आलं. रुटनं ३७७ चेंडूंत १९ चौकार व २ षटकार खेचून २१८ धावा चोपल्या, शाहबाज नदीमनं त्याला पायचीत केलं.
- जो रुटनं पाचव्या विकेटसाठी ऑली पोपसोबत ८६ धावा जोडल्या. त्यानंतर जोस बटलर व डॉम बेस यांनी आक्रमक खेळ करताना सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करताना संघाला पाचशेचा पल्ला पार करून दिला.
- या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी १६ नो बॉल फेकले. यापूर्वी २०१०मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी १६ नो बॉल टाकले होते. २०१५मध्ये वेस्ट इंडिज ( पहिला डाव) संघानं इंग्लंडविरुद्ध १८ नो बॉल टाकले होते. जो रूटचा भन्नाट फॉर्म, टीम इंडियाची धुलाई करताना ९३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
- इशांत शर्मानं सलग दोन चेंडूवर इंग्लंडला धक्के दिले, परंतु त्याला हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही. भारताकडून इशांत, शाहबाज नदीम, आर अश्विन व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
- रोहित शर्मानं सोपा झेल सोडून इंग्लंडच्या फलंदाजाला जीवदान दिलं. या सामन्यात टीम इंडियानं चार झेल सोडले.