ठळक मुद्देहा झेल जर कार्तिकने टिपला असता तर इंग्लंडचा संघ सामन्याच्या पहिल्याच दिवशी माघारी परतला असला.
बर्मिंगहॅम : जी गोष्ट तुमच्या नशिबात असते ती तुम्हाला मिळाल्या वाचून राहत नाही. या गोष्टीचा प्रत्यय तुम्हाला काही वेळा आलाही असेल, आज पुन्हा एकदा या गोष्टीचा प्रत्यय आला. इंग्लंड आणि भारत याच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ही गोष्ट घडली. अन् इंग्लंडचा अखेरचा बळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्याच नशिबात असल्याचे दिसून आले.
घडले असे की, इंग्लंडची 9 बाद 285 अशी बुधवारी स्थिती होती. शमीच्या बुधवारच्या अखेरच्या षटकात इंग्लंडच्या सॅम कुरनचा झेल उडाला होता. हा झेल यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने सोडला. हा झेल जर कार्तिकने टिपला असता तर इंग्लंडचा संघ सामन्याच्या पहिल्याच दिवशी माघारी परतला असला.
कुरनला आपल्या गोलंदाजीवर जीवदान मिळाल्याच पाहून शमी नाराज झाला. पण त्याच्या ललाटलेखात काय लिहिले आहे, हे त्याला माहिती नव्हते. दुसऱ्या दिवशी शमीच्या गोलंदाजीवर कुरन बाद झाला आणि त्याचा झेल टिपला तो कार्तिकनेच.
कार्तिकने शमीच्या गोलंदाजीवर सोडलेल्या झेलचा हा व्हिडीओ
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शमीच्याच गोलंदाजीवर कार्तिकनेच झेल टिपला तो क्षण
Web Title: India vs England 1st Test: englad's last wicket is in th name of Mohammad Shami
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.