Join us  

India vs England, 1st Test : इंग्लंडचं मजबूत 'ROOT'; १००व्या कसोटीत कर्णधाराची ऐतिहासिक खेळी!

India vs England 1st Test : जो रुट व डॉम सिब्ली यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतात भारताविरुद्ध केलेली ही दुसरी द्विशतकी भागीदारी आहे. यापूर्वी २०१२मध्ये जॉनथन ट्रॉट व इयान बेन यांनी चौथ्या विकेटसाठी दोनशे धावा जोडल्या होत्या.  

By स्वदेश घाणेकर | Published: February 05, 2021 5:00 PM

Open in App

India vs England, 1st Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. डॉम सिब्ली ( Dom Sibley) आणि रोरी बर्न्स ( Rory Burns) यांनी इंग्लंडला आश्वासक सुरूवात करून दिली. श्रीलंका दौरा गाजवणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं भारतीय गोलंदाजांना दमवलं. रुटचे खणखणीत शतक व सिब्लीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसात इंग्लडनं 3 बाद २६३ धावा केल्या. दिवसाच्या अखेरच्या षटकात जसप्रीत बुमरानं सिब्लीला ( ८७) माघारी पाठवले. रुट १२८ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांची केली धुलाई 

पहिल्या दिवसाच्या खेळातील हायलाईट्स

- राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत नेट्समध्ये सराव करणाऱ्य़ा शाहबाज नदीमला ( Shahbaz Nadeem) अचानक Playing XI मध्ये संधी देत कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

- १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं या सामन्यात प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला विश्रांती देण्याचा धाडसी निर्णय घेतला. Bad News; सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडूची माघार

- १७ कसोटी व ७९ विकेट्सनंतर मायदेशात पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली असती, परंतु रिषभ पंतनं ( Rishabh Pant) झेल सोडला.

- इंग्लंडचे सलामीवीर डॉम सिब्ली ( Dom Sibley) आणि रोरी बर्न्स ( Rory Burns) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. पण, आर अश्विननं बर्न्सला माघारी पाठवले, त्यानतंर बुमराहनं डॅन लॉरेन्स ( ०) याला पायचीत केले आणि पहिल्या सत्रात इंग्लंडची अवस्था २ बाद ६७ अशी झाली. जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल

- जो रुट व डॉम सिब्ली यांनी शतकी भागीदारी करताना दुसऱ्या व तिसऱ्या सत्रावर वर्चस्व गाजवले.  जो रूटनं आतापर्यंत भारतात ७ कसोटी सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यातील किमान एका डावात तरी त्यानं ५० किंवा ५०+ धावा केल्या आहेत.  ICC World Test Championships scenarios: टीम इंडिया कशी करू शकते अंतिम फेरीत प्रवेश?; इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनाही संधी

-  जो रुटची भारतातील कसोटी सामन्यांतील कामगिरी ७३ व २०* ( नागपूर), १२४ व ४ ( राजकोट), ५३ व २५ ( वायझॅक), १५ व ७६ ( मोहाली), २१ व ७७ ( मुंबई), ८८ व ६ ( चेन्नई), ५१* (चेन्नई) 

- पण, ९८, ९९  व १०० व्या सामन्यात शतकी खेळी करणारा जो रुट हा जगातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. भारतात दाखल होण्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटीत त्यानं ( २२८ व १८६)  शतकी खेळी केली होती.   

- जो रुट व डॉम सिब्ली यांनी तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतात भारताविरुद्ध केलेली ही दुसरी द्विशतकी भागीदारी आहे. यापूर्वी २०१२मध्ये जॉनथन ट्रॉट व इयान बेन यांनी चौथ्या विकेटसाठी दोनशे धावा जोडल्या होत्या.  

हेही वाचलंत का?

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटजसप्रित बुमराहआर अश्विन