India vs England, 1st Test Day 4 : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाहुण्या संघानं टीम इंडियावर फॉलोऑन लादला नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३३७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं, परंतु आर अश्विन ( R Ashwin) वगळता तळाच्या अन्य फलंदाजांची त्यांना साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करावी लागली. ५ बाद १९२ वरून टीम इंडियानं मारलेली मजल नक्की कौतुकास्पद आहे.
मॅचचे हायलाईट्स..
- सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.
- रिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतला. पुजारा व रिषभ यांनी ११९ धावांची भागीदारी केली. पण, ही जोडी माघारी परतल्यानंतर टीम इंडिया पुन्हा संकटात सापडली. Video : पाकिस्तानी फलंदाज धावला 'मांजरी'च्या मागे; सहकारी म्हणाला, अज्जू भाई ती बायो बबलमध्ये नाहीय!
- ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर व आर अश्विन या जोडीनं इंग्लडच्या गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी ८० धावांची भागीदारी केली आणि सुंदरनं खणखणीत अर्धशतक झळकावले.
- वॉशिंगटननं सलग दोन कसोटी सामन्यांत अर्धशतक झळकावलं. त्याची फटकेबाजी पाहून सर्वच अवाक् झाले... ड्रेसिंग रुममध्ये बसलेला कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही कौतुक करताना दिसले. ICC Poll : विराट कोहलीला धक्का; पाकिस्तानचा बाबर आझम ठरला 'Cover Drive King'!
- आर अश्विन ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक खेळ केला. पण, अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. वॉशिंग्टन १३८ चेंडूंत १२ चौकार व २ षटकार मारून ८५ धावांवर नाबाद राहिला.
- डॉम बेसनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
- यापूर्वी २००९/१० ( नागपूर) दक्षिण आफ्रिकेला आणि २०१४ ( रोसबॉल) इंग्लंडला भारताला फॉलोऑन देण्याची संधी मिळाली होती.
Web Title: India vs England, 1st Test : India bowled out for 337, England will bat, they lead by 241 runs in the first innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.