India vs England, 1st Test Day 4 : इंग्लंडच्या फलंदाजांनी दाखवलेला दम टीम इंडियाच्या स्टार फलंदाज दाखवण्यात कमी पडले. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा व वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाची इभ्रत वाचवली. इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती, परंतु त्यांनी पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आक्रमक खेळ करण्याच्या इराद्यानेच ते मैदानावर उतरले. आर अश्विननं त्यांना धक्के दिले, पण मोठी आघाडी घेण्यापासून त्यांना रोखता आले नाही. इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर गडगडला. त्यांनी टीम इंडियासमोर तगडं आव्हान ठेवलं आहे, आर अश्वननं सहा विकेट्स घेतल्या. Big Breaking : रिषभ पंतनं पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; इंग्लंडच्या कर्णधारावर केली मात
मॅचचे हायलाईट्स - इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडनं पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेऊनही टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून रिषफ तंत ( ९१), वॉशिंग्टन सुंदर ( ८५*) आणि चेतेश्वर पुजारा ( ७३) यांनी उल्लेखनीय खेळ केला.
- इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडनं पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, त्यांना दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नव्या चेंडूवर पहिले षटक आर अश्विनच्या हाती सोपवलं आणि त्यानं १०० वर्षांत कुणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवला. ( ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video)
- दरम्यान इशांत शर्मानं कसोटी क्रिकेटमध्ये ३०० वी विकेट घेतली. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो सहावा आणि तिसरा जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे ( ६१९), कपिल देव ( ४३४), हरभजन सिंग ( ४१७), आर अश्विन ( ३८२), झहीर खान ( ३११) यांनी हा पल्ला पार केला. २० वर्षांनतर टीम इंडियाच्या बाबतीत घडली 'ही' अजब घटना; तुम्हालाही वाटेल आश्चर्य
- इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ सुरूच ठेवताना मोठ्या आघाडीच्या दिशेनं कूच केली आहे. यापूर्व २००८-०९मध्ये भारतानं इंग्लंडविरुद्ध ४ बाद ३८७ धावांचे लक्ष्य पार केले होते. त्या सामन्यात सचिन तेंडुलकर १०३ धावांवर नाबार राहिला होता. इंग्लंडनं आजच्या सामन्यात तोही पल्ला सर केला.
- आर अश्विननं ६१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळला. भारताला विजयासाठी ४२० धावा करायच्या आहेत आणि १०५ षटकं खेळून काढायची आहेत.