मुंबई : काही मैदानांची खासीयत असते. तिथे होणारा खेळ, लागणारे निकाल हे लक्षवेधी ठरतात. काही संघांना एखादे मैदान लकी ठरते तर काही संघांना अनलकी. बर्मिंगहमचेच उदाहरण घ्या ना. या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये यापूर्वी सहा सामना झाले होते. पण भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता. या मैदानातही भारताला पुन्हा एकदा पराभवाचीच प्रचिती आली.
आतापर्यंत (हा सामना धरल्यास) भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सात सामने खेळवले गेले. या सातपैकी सहा सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली, तर एक सामना अनिर्णित राहीला होता. त्यामुळे या मैदानात भारताचा संघ एकदाही जिंकू शकलेला नाही.
या मैदानात इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला सामना 1967 साली खेळवला गेला. हा सामना इंग्लंडने 132 धावांनी जिंकला होता. या मैदानात 2011 साली भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सहावा सामना खेळवला गेला होता या सामन्यात भारताला एक डाव आणि 242 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आज संपलेल्या सातव्या सामन्यातही भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला.