India vs England 1st Test: पहिल्या सत्रात भारताचे निर्विवाद वर्चस्व

India vs England 1st Test: कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीने प्रेरित झालेल्या भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:41 PM2018-08-03T17:41:07+5:302018-08-03T17:43:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test: India's Indestructible Domination in the First Session | India vs England 1st Test: पहिल्या सत्रात भारताचे निर्विवाद वर्चस्व

India vs England 1st Test: पहिल्या सत्रात भारताचे निर्विवाद वर्चस्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एडबॅस्टन - कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीने प्रेरित झालेल्या भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. 1 बाद 9 धावांवरून शुक्रवारी डावाची सुरूवात करणा-या इंग्लंडचे पाच फलंदाज अवघ्या 77 धावांवर माघारी परतले. फिरकीपटू आर अश्विनने तिस-या दिवशी दोन प्रमुख खेळाडूंना बाद केल्यानंतर जलदगती गोलंदाज इशांत शर्माने तीन बळी घेतले. इशांतने डेविड मलान, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांना बाद केले. उपहारापर्यंत इंग्लंडच्या 6 बाद 86 धावा झाल्या असून त्यांनी 99 धावांची आघाडी घेतली आहे.



रविचंद्रन अश्विनने भारताला पहिल्याच सत्रात मोठे यश मिळवून दिले. गुरूवारी सलामीवीर अॅलेस्टर कुकचा अडथळा दूर करणा-या अश्विनने शुक्रवारी तासाभरात इंग्लंडला आणखी दोन धक्के दिले. त्याने किटन जेनिंग्सला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. मात्र, कर्णधार जो रूटची विकेट भारतासाठी महत्त्वाची ठरली. दुस-या स्लिपमध्ये राहुलने अप्रतिम झेल घेत रूटला तंबूची वाट दाखवली. 

Web Title: India vs England 1st Test: India's Indestructible Domination in the First Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.