India vs England, 1st Test: भारताचे ओपनर स्वस्तात माघारी; टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट?

India vs England, 1st Test: भारत अजून   ५१९ धावांनी पिछाडीवर आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 7, 2021 11:59 AM2021-02-07T11:59:18+5:302021-02-07T12:00:05+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test: Jofra Archer removed Rohit Sharma & Shubman Gill, Watch Wicket | India vs England, 1st Test: भारताचे ओपनर स्वस्तात माघारी; टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट?

India vs England, 1st Test: भारताचे ओपनर स्वस्तात माघारी; टीम इंडियावर फॉलोऑनचं संकट?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडनं पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला जोरदार धक्के बसले. जो रुट ( Joe Root) च्या २१८ धावा, डॉम सिब्ली ( ८७) व बेन स्टोक्स ( ८२) यांची अर्धशतकी खेळी आणि रोरी बर्न्स ( ३३), ऑली पोप ( ३४), जोस बटलर ( ३०) व डॉम बेस ( ३४) यांच्या योगदानाच्या जोरावर इंग्लंडनं ही मोठी मजल मारली. पण, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) यांना मोठी खेळी करण्यापासून इंग्लंडच्या गोलंदाजांनी रोखले. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताच्या २ बाद ५९ धावा झाल्या आहेत. भारत अजून   ५१९ धावांनी पिछाडीवर आहे. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी किमान ३२० धावा कराव्या लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मॅचचे हायलाईट्स
- इंग्लंडच्या संघानं १९०.१ षटकं खेळली. यापूर्वी २००९मध्ये भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत २०२.४ षटकं फेकावी लागली होती. 

-  भारतीय गोलंदाजांनी निराश केलेच, शिवाय क्षेत्ररक्षणातही ढिसाळ कामगिरी केली. विराट कोहली ( Virat Kohli) आणि DRS यांच्यातील छत्तीसचा आकडा याही सामन्यात कायम दिसला. विराटनं घेतलेले तीनही DRS वाया गेले आणि त्यामुळेच जोस बटलर झेलबाद असूनही केवळ पंचांनी नाबाद दिल्यानं तो भारतीय गोलंदाजांची धुलाई करत राहिला. सोपा झेल सोडला अन् फलंदाजीतही अपयशी ठरला; रोहित शर्माला इंग्लंडच्या खेळाडूनं दिली  'ही' ऑफर!

- भारतीय खेळाडूंनी चार झेल सोडले. यष्टिरक्षक रिषभ पंतनं एक झेल, एक रन आऊट आणि एक स्टम्पिंग सोडून इंग्लंडला मदतच केली. रोहित शर्मानंही सोपा झेल सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या हातून हा सुटलेला झेल पाहून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानंही आश्चर्य व्यक्त केलं. 

-  रोहित शर्मा ( ६) चौथ्याच षटकात जोफ्रा आर्चरच्या उसळी घेतलेल्या चेंडूवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर आर्चनं टीम इंडियाला दुसरा धक्का देताना शुबमन गिलला ( २९) माघारी पाठवले. भारताचे दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर माघारी परतले.  चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्...

पाहा दोन्ही विकेट्स

Web Title: India vs England, 1st Test: Jofra Archer removed Rohit Sharma & Shubman Gill, Watch Wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.