ऑनलाईन लोकमत : २०१४ च्या इंग्लंड दौºयातील सगळेच अपयश टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने एकाच सामन्यात धूवुन काढले आहे. २०१४च्या दौऱ्यात पाचही कसोटी सामन्यात १० डावात कोहलीने फक्त २८८ चेंडूंचा सामना केला होता. तर इंग्लंड विरोधातील पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने ३१८ चेंडू खेळले.
पहिल्या कसोटीत भारताकडून सर्वात जास्त धावा करणाऱ्या विराट कोहलीने २०१४ च्या दौऱ्यातील अपयश विसरत या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने ३१८ चेंडूचा सामना करताना २०० धावा केल्या. २०१४ च्या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत कोहलीला फक्त ३७ चेंडूचा सामना करता आला होता. त्याने ९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत त्याने ३५ चेंडूचा सामना केला होता. त्यात दुसºया डावात तर लियाम प्लंकेट याने कोहलीला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.
तिसऱ्या कसोटीत कोहलीने पहिल्या डावात ७५ चेंडूत ३९ आणि दुसºया डावात ५६ चेंडूत २८ धावा केल्या. या सामन्या त्याने १३१ चेंडूचा सामना केला होता. चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात कोहली दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होता. तर दुसºया डावात त्याला फक्त ११ चेंडूचा सामना करता आला होता. पाचव्या कसोटी सामन्यात कोहलीने पहिल्या डावात १२ आणि दुसऱ्या डावात ५४ चेंडूचा सामना केला होता.
कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी काही दिवसांपुर्वी म्हटले होते की विराट २०१४ च्या दौऱ्यातील अपयश विसरला आहे. आपल्या प्रशिक्षकांचे हे म्हणणे विराटने पहिल्याच सामन्यात खरे करून दाखवले आहे.