बर्मिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवस गाजवला तो भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने. इंग्लंडच्या चार फलंदाजांना करत अश्विनने भारताला पहिल्याच दिवशी आघाडी मिळवून दिली. पण अश्विनला हे यश का मिळाले, याचे विश्लेषण केले आहे ते भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने.
अश्विनच्या पहिल्या दिवशीच्या गोलंदाजीबाबत लक्ष्मणने सांगितले की, " इंग्लंडच्या दौऱ्यात अश्विनला यापूर्वी जास्त यश मिळाले नव्हते. पण पहिल्याच दिवशी मात्र अश्विनची गोलंदाजी चांगलीच गाजली. कारण अश्विनने यावेळी मारा करताना आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता ठेवली होती. त्याने आपल्या चेंडूचा वेग, टप्पा आणि दिशा यामध्ये चांगले बदल केले. त्यामुळेचइंग्लंडचे फलंदाज त्याची गोलंदाजी खेळताना अडखळत होते. या गोष्टीचा फायदा आर.अश्विनने उचलला आणि त्याला चार बळी मिळू शकले."
अश्विनचा असाही विक्रमइंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 वेळा बाद करणारा अश्विन हा दुसरा ऑफ स्पिनर ठरला. ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉन हा पहिला फिरकीपटू आहे. यामागोमाग भारताच्याच रविंद्र जडेजाचा क्रमांक येतो. अश्विनने सर्वाधिकवेळा बाद करणा-या फलंदाजांमध्ये कुक दुस-या स्थानावर आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नरला नऊ वेळा बाद केले आहे.