india vs England 2021 1st test match live cricket score : दोन दिवसांचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांची चांदी झाली. भारत- इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना रंजक वळणावर पोहोचला आहे. पहिल्या डावात १८३ धावांवर इंग्लंडला गुंडाळून भारतानं २७८ धावांसह ९५ धावांची आघाडी घेतली. ही पिछाडी भरून काढण्यात इंग्लंडची दमछाक झाली, परंतु कर्णधार जो रुटनं यशस्वी खिंड लढवताना भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. India vs England 1st Test Live, India vs England 1st Test
रोरी बर्न्स ( १८) व डॉम सिब्ली ( २८) यांना पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. झॅक क्रॅवली ( ६) याला बाद करून जसप्रीत बुमराहनं पहिल्या तीन विकेट्समधील दोन बळी टिपले. मोहम्मद सिराजनं इंग्लंडला पहिला धक्का दिला. कर्णधार रूट भारतीय गोलंदाजांसमोर पहाडासारखा उभा राहिला. चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी भारताचा माजी महान फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यानं विधान केलं होतं, ते म्हणजे. भारताच्या विजयात रूट हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. ते आज खरे ठरले. जॉनी बेअरस्टो ( ३०) यानं रूटला साथ दिली, परंतु सिराजनं त्यालाही बाद केलं. Ind vs Eng 1st Test live, Eng vs ind 1st test live score
डॅन लॉरेन्स ( २५), जोस बटलर ( १७), सॅम कुरन ( ३२) यांचीही रुटला साथ मिळाली, परंतु भारतासमोर मोठं आव्हान करण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही. रूटनं १७२ चेंडूंत १४ चौकारांसह १०९ धावा केल्या आणि त्याला बुमराहनं बाद केले. बुमराहनं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. कुरन व स्टुअर्ट ब्रॉड यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवल्यानंतर बुमराहला हॅटट्रिकची संधी होती, परंतु जेम्स अँडरसननं त्याला यश मिळवू दिले नाही. इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर गुंडाळला गेला. भारतासमोर विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य आहे.Eng vs Ind 1st test live score board, Ind vs End 1st test match live