India vs England 1st Test Live : आर अश्विन, इशांत शर्मा संघाबाहेर; पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात तीन मोठे बदल

india vs England 2021 1st test match live cricket score : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद न्यूझीलंड संघानं पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:16 PM2021-08-04T15:16:25+5:302021-08-04T15:17:05+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Live Cricket Score : England have won the toss and will bat first, know team India Playing XI  | India vs England 1st Test Live : आर अश्विन, इशांत शर्मा संघाबाहेर; पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात तीन मोठे बदल

India vs England 1st Test Live : आर अश्विन, इशांत शर्मा संघाबाहेर; पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात तीन मोठे बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

india vs England 2021 1st test match live cricket score : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद न्यूझीलंड संघानं पटकावले. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील किवी संघानं विराट कोहलीच्या टीम इंडियावर विजय मिळवून हे जेतेपद नावावर केले. आता भारतीय संघ कसोटी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या पर्वासाठी सज्ज झाला आहे आणि आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेतूनच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( England win the toss and bat. ) 

शुबमन गिल आणि मयांक अग्रवाल यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासह पहिल्या कसोटीत लोकेश राहुल सलामीला येणार आहे. भारतानं आजच्या सामन्यात आर अश्विन, इशांत शर्मा यांना प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवले आहे आणि त्यांच्याजागी लोकेश राहुल, शार्दूल ठाकर व मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे


भारताचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज ( XI: Rohit Sharma, KL Rahul, Cheteshwar Pujara, Virat Kohli (c), Ajinkya Rahane, Rishabh Pant (wk), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Shami, Mohammad Siraj)


इंग्लंडचा संघ - रोरी बर्न्स, डॉमिनिक  सिब्ली, झॅक क्रॅवली, जो रूट, जॉनी बेअरस्टो, डॅनिएर लॉरेन्स, जोस बटलर, सॅम कुरन, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन (  Rory Burns, Dominic Sibley, Zak Crawley, Joe Root (c), Jonny Bairstow, Daniel Lawrence, Jos Buttler (wk), Sam Curran, Ollie Robinson, Stuart Broad, James Anderson)  


कशी असेल नवीन Points System 
प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्यामुळे गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक सामन्याला समान गुण दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक कसोटी विजयाला १२ गुण दिले जाणार आहेत, सामना बरोबरीत सुटल्यास ६-६, तर अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण दिले जाणार आहेत. या गुणांसोबतच टक्केवारीही ठरली आहे. १२ गुणांला १०० टक्के, ६ गुणांना ५० टक्के आणि ४ गुणांना ३३.३३ टक्के दिले जाणार आहेत. दोन सामन्यांची मालिका २४, तिन सामन्यांची मालिका ३६, चार सामन्याची मालिका ४८ आणि पाच सामन्यांची मालिका ६० गुणांची असणार आहे. 
 

Web Title: India vs England 1st Test Live Cricket Score : England have won the toss and will bat first, know team India Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.