India vs England 1st Test Live : पावसानं वाट लावली; टीम इंडियाला गमवावे लागले १२ गुण, मात्र इंग्लंडची चांदी झाली!

India vs England 2021 1st test match live cricket score : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) दुसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला इतिहास घडवण्याच्या संधीवर पावसानं पाणी फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:29 PM2021-08-08T20:29:03+5:302021-08-08T20:32:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Live Cricket Score : First Test between India and England ends in a draw, know WTC point Table | India vs England 1st Test Live : पावसानं वाट लावली; टीम इंडियाला गमवावे लागले १२ गुण, मात्र इंग्लंडची चांदी झाली!

India vs England 1st Test Live : पावसानं वाट लावली; टीम इंडियाला गमवावे लागले १२ गुण, मात्र इंग्लंडची चांदी झाली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2021 1st test match live cricket score : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) दुसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला इतिहास घडवण्याच्या संधीवर पावसानं पाणी फिरवले. इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतासमोर विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य होते. चौथ्या दिवसअखेर लोकेश राहुलची ( २६) विकेट गमावत भारतानं १ बाद ५२ धावा केल्या. त्यामुळे पाचव्या दिवशी १५७ धावा करून टीम इंडियाला विजय मिळवण्याची संधी चालून आली होती. पण, पाचव्या दिवसाचा साडेतीन तासांचा खेळ वाया गेला आहे आणि अजूनही पावसाची बॅटिंग सुरूच असल्यानं सामना अखेरीस रद्द करावा लागला. 
 


 पहिल्या डावात १८३ धावांवर इंग्लंडला गुंडाळून भारतानं २७८ धावांसह ९५ धावांची आघाडी घेतली. कर्णधार जो रुटनं दुसऱ्या डावात १७२ चेंडूंत १४ चौकारांसह १०९ धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं ५, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.  लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुलनं सॉलिड खेळ केला, परंतु ३८ चेंडूंत २६ धावा करून त्याला माघारी जावं लागलं. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारानं आणखी धक्का बसू दिला नाही. रोहित १२ व पुजारा १२ धावांवर खेळत असून टीम इंडियानं दिवसअखेर १ बाद ५२ धावा केल्या होत्या. नॉटिंग्हॅमवर इतिहास रचण्यासाठी भारताला आणखी १५७ धावांची गरज होती, परंतु पावसानं पाचव्या दिवसाचा खेळ वाया घालवला. सामना अनिर्णीत राहिल्यानं दोन्ही संघांना ४-४ गुण दिले गेले आहेत. 

कशी असेल नवीन Points System 
प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्यामुळे गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीनं प्रत्येक सामन्याला समान गुण दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक कसोटी विजयाला १२ गुण दिले जाणार आहेत, सामना बरोबरीत सुटल्यास ६-६, तर अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण दिले जाणार आहेत. या गुणांसोबतच टक्केवारीही ठरली आहे. १२ गुणांला १०० टक्के, ६ गुणांना ५० टक्के आणि ४ गुणांना ३३.३३ टक्के दिले जाणार आहेत. दोन सामन्यांची मालिका २४, तिन सामन्यांची मालिका ३६, चार सामन्याची मालिका ४८ आणि पाच सामन्यांची मालिका ६० गुणांची असणार आहे. 
 

Web Title: India vs England 1st Test Live Cricket Score : First Test between India and England ends in a draw, know WTC point Table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.