india vs England 2021 1st test match live cricket score : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीचं पहिलं सत्र भारतीय गोलंदाजांच्या नावावर राहिले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत यजमानांना दणके दिले. या सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आल्यामुळे दोन्ही संघांचे पाठीराखे खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. अशात स्टेडियमवर एक रिकामी खुर्ची सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या रिकामी खुर्चीमागे एक इमोशनल स्टोरी आहे...
जॉन क्लार्क या व्यक्तिच्या नावानं हे तिकीट खरेदी केलं गेलं आहे आणि क्लार्क हयात नाही... मागील ४० वर्षांत ट्रेंट ब्रिजवर असा एकही सामना झाला नाही जो क्लार्कनं स्टेडियमवर उपस्थित राहून पाहिलेला नाही. हे क्रिकेटप्रेम त्याच्या निधनानंतर मित्रांकडून जपलं जात आहे. त्याच्या मित्रांनी भारत-इंग्लंड कसोटी सामन्याचे तिकीट खरेदी केले आणि ती खुर्ची रिकामी ठेवली. सोशल मीडियावर मैत्रीची साक्ष देणारा फोटो व्हायरल होत आहे. ( Brilliant story about John Clarke, who hasn’t missed a game in 40 years in Trent Bridge. He has passed, but his friends have still bought his tickets and reserves a seat for him to watch. Lovely)
भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅम येथे सुरू झाला अन् भारतानं पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना ६२ धावांवर माघारी पाठवले. आर अश्विन आणि इशांत शर्मा या दोन प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया मैदानावर उतरल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीसामन्यापासून सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात त्यांना धक्का दिला. रोरी बर्न्स पाचव्याच चेंडूवर पायचीत होऊन भोपळ्यावर माघारी परतला. त्यानं डॉम सिब्ली व झॅक क्रॅवली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद सिराजनं त्याची विकेट घेतली. क्रॅवलीला २७ धावांवर माघारी जावं लागलं. मोहम्मद शमीनं तिसरी विकेट घेताना डॉम सिब्लीला ( १८) बाद केले.
Web Title: India vs England 1st Test Live Cricket Score : Friends reserve an empty seat for a deceased who never missed a match at Trent Bridge in 40 years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.