India vs England 1st Test Live : लोकेश राहुल, रवींद्र जडेजा यांनी लाज राखली; जसप्रीत बुमराहच्या फटकेबाजीनं मोठी आघाडी मिळवून दिली!

India vs England 1st Test Live Cricket Score : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियानं समाधानकारक आघाडी घेण्यात यश मिळवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:18 PM2021-08-06T20:18:53+5:302021-08-06T20:19:23+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Live Cricket Score : India lead by 95 runs in the first innings, they post 278 runs in the first innings | India vs England 1st Test Live : लोकेश राहुल, रवींद्र जडेजा यांनी लाज राखली; जसप्रीत बुमराहच्या फटकेबाजीनं मोठी आघाडी मिळवून दिली!

India vs England 1st Test Live : लोकेश राहुल, रवींद्र जडेजा यांनी लाज राखली; जसप्रीत बुमराहच्या फटकेबाजीनं मोठी आघाडी मिळवून दिली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st Test Live Cricket Score : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियानं समाधानकारक आघाडी घेण्यात यश मिळवलं. लोकेश राहुलरवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं कसोटीचा तिसरा दिवस गाजवला.  इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे प्रमुख खेळाडू अपयशी ठरले, पण, लोकेश राहुलरवींद्र जडेजा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. जसप्रीत बुमराहनं फटकेबाजी करून उपस्थितांची दाद मिळवली... ऑली रॉबिन्सननं ( ५/८५) पाच आणि जेम्स अँडरसननं ( ४/५४) चार विकेट्स घेतल्या. 
India vs England 1st Test Live Score 

दुसऱ्या दिवसाचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी ३.३० वाजता सुरू झाला, परंतु ११ चेंडू टाकल्यानंतर पावसाच्या आगमनामुळे सामना पुन्हा थांबवण्यात आला.  रोहित शर्मा व लोकेश यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, जेम्स अँडरसनच्या एका षटकानं टीम इंडियाच्या गोटात भीतीचा गोळा टाकला. विराट ( ०), पुजारा ( ४) आणि रहाणे ( ५) झटपट माघारी परतले. लोकेशने पाचव्या विकेटसाठी रिषभ पंतसह ३३ धावा जोडल्या, परंतु ऑली रॉबिन्सननं रिषभला ( २५) बाद केले. India vs England 1st Test Live, India vs England 1st Test



त्यानंतर जडेजानं लोकेशला साथ दिली आहे. कसोटीत २०००+ धावा आणि २०० विकेट्स घेण्याचा मान जडेजानं पटकावला.  ( Indian players to complete the double of 200 wickets and 2000 runs in Tests) कपिल देव, आर अश्विन, अनील कुंबळे व हरभजन सिंग यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. शकताच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकेशला बाद करून अँडरसननं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. लोकेशनं २१४ चेंडूंत १२ चौकारांसह ८४ धावा केल्या. त्यानंतर जडेजानं फटकेबाजी केली. त्यानं ८६ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५६ धावा केल्या. जडेजा-मोहम्मद शमी जोडीनं २७ आणि शमी-जसप्रीत बुमराह जोडीनं १३ धावांची भागीदारी केली. जसप्रीतनं फटकेबाजी करताना ३ चौकार व १ षटकारासह  २८ धावा केल्या. भारतानं पहिल्या डावात २७८ धावा करत ९५ धावांची आघाडी घेतली. Ind vs Eng 1st Test live, Eng vs ind 1st test live score

जेम्स अँडरसननं मोडला अनिल कुंबळेचा विक्रम
जेम्स अँडरसननं आजच्या सामन्यात भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे याचा विक्रम मोडला. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मुथय्या मुरलीधरन ( ८००) व शेन वॉर्न ( ७०८) अव्वल दोन स्थानावर आहेत. त्यानंतर अँडरसन ( ६२०*) आणि अनिल कुंबळे ( ६१९)  यांचा क्रमांक येतो. Eng vs Ind 1st test live score board, Ind vs End 1st test match live

Web Title: India vs England 1st Test Live Cricket Score : India lead by 95 runs in the first innings, they post 278 runs in the first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.