India vs England 1st Test Live Day 2 : जेम्स अँडरसननं घेतल्या सलग दोन विकेट्स, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, Video

India vs England 1st Test Live Cricket Score : कसोटीत प्रथमच सलामीला एकत्र आलेल्या रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच रडवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:53 PM2021-08-05T18:53:27+5:302021-08-05T18:57:17+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Live Cricket Score : Virat Kohli became a most Golden Ducks Indian Test captains, Jimmy Anderson take 2 on 2 watch Video  | India vs England 1st Test Live Day 2 : जेम्स अँडरसननं घेतल्या सलग दोन विकेट्स, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, Video

India vs England 1st Test Live Day 2 : जेम्स अँडरसननं घेतल्या सलग दोन विकेट्स, विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st Test Live Cricket Score : कसोटीत प्रथमच सलामीला एकत्र आलेल्या रोहित शर्मालोकेश राहुल या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच रडवले. भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीत आतापर्यंत टीम इंडियाचे वर्चस्व जाणवत आहे. भारतीय गोलंदाजांनी यजमानांचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर रोहित व लोकेश यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, जेम्स अँडरसनच्या एका षटकानं टीम इंडियाच्या गोटात भीतीचा गोळा टाकला अन् कर्णधार विराट कोहली याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.   India vs England 1st Test Live, India vs England 1st Test

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना इंग्लंडला पहिल्या डावात दोनशेपारही जाऊ दिले नाही. कर्णधार जो रूट ( ६४) वगळल्यास इंग्लंडचे अन्य फलंदाज भारतासमोर नांगी टेकून माघारी परतले. जसप्रीत बुमराह ( ४) , शार्दूल ठाकूर ( २ ) , मोहम्मद सिराज ( १ ) व मोहम्मद शमी ( ३ ) यांनी इंग्लंडला धक्के दिले. रुटनं १०८ चेंडूंत ११ चौकारांसह ६४ धावा केल्या. सॅम कुरननं फटकेबाजी करताना नाबाद २७ धावा काढल्या. बुमराहनं इंग्लंडची अखेरची विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गडगडला.  Ind vs Eng 1st Test live, Eng vs ind 1st test live score

रोहित व लोकेश यांनी पहिल्या विकेटसाठी ३७.३ षटकं खेळून काढताना ९७ धावांची भागीदारी केली. २००७ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीरांना २५ पेक्षा अधिक षटकं खेळण्यात यश आलं आहे. २००७मध्ये दिनेश कार्तिक व वासीम जाफर यांनी हा पराक्रम केला होता.  ऑली रॉबिन्सननं ही जोडी तोडली. त्यानं रोहित शर्माला ( ३६ धावा, १०७ चेंडू) माघारी पाठवले. त्यानंतर अँडरसननं ४१व्या षटकात टीम इंडियाला सलग दोन धक्के दिले. चेतेश्वर पुजारा ( ४)ला यष्टिरक्षक जोस बटलरकरवी बाद केल्यानंतर कर्णधार विराटलाही त्यानं गोल्डन डकवर माघारी जाण्यास भाग पाडले. दरम्यान लोकेशनं अर्धशतक पूर्ण केले, परंतु अजिंक्य रहाणे (५) एकदा वाचूनही दुसऱ्यांदा धावबाद होऊन माघारी परतला. Eng vs Ind 1st test live score board, Ind vs End 1st test match live

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९ वेळा गोल्डन डक ( पहिल्याच चेंडूवर) बाद होण्याचा नकोसा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे. महेंद्रसिंग धोनी ८ आणि मन्सुर अली खान पतौडी ७ यांचा विक्रम मोडला.  



 

Web Title: India vs England 1st Test Live Cricket Score : Virat Kohli became a most Golden Ducks Indian Test captains, Jimmy Anderson take 2 on 2 watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.